शासन प्राप्त परिपत्रकानुसारच दुर्गोत्सव साजरा करण्यात यावा पो.स्टेशन रावेर तर्फे आवाहन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


संग्रहित छायाचित्र

तामसवाडी ता.रावेर प्रतिनिधि (राजेश रायमळे) शासनामार्फत प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसारच आगामी दुर्गोत्सव साजरा करण्यात यावा अशा प्रकारचे आवाहन पोलीस स्टेशन रावेर येथून करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की,प्राप्त माहितीनुसार पोलीस स्टेशन रावेर येथे शासनामार्फत जारी करण्यात आलेले आगामी दुर्गोत्सवाबाबतचे परिपत्रक आजच प्राप्त झाले  [ads id="ads2"]  असून प्राप्त परिपत्रकाचे आधारे पोलीस स्टेशन रावेर येथून पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या व रावेर तालुक्यातील सर्वच दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांना सुचना करण्यात आल्या व आव्हान करण्यात आले की,दुर्गोत्सववाबाबत मा. शासनाकडुन वरील प्रमाणे सुचना व जा परिपत्रक आज रोजी प्राप्त झाले असुन  दि.05/10/2021 व दि.06/10/2021 रोजी परवानगी देण्यात येणार आहे.

 [ads id='ads1]

तरी सर्व मंडळांनी परवानगी घेवुनच दुर्गा देवी मुर्तीची  स्थापना करावी कोणीही विनापरवानगी दुर्गा स्थापना करू नये. तसेच मा. शासन परिपत्रकानुसार ०४ फुटाचे आत दुर्गादेवी मुर्ती स्थापना करावी स्थापना मिरवणूक व  विसर्जन मिरवणूक काढू नये आदी बाबींचे तंतोतंत पालन करावे.असे आवाहन रावेर पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे.