खोपोली : मुंबई-पुणे (Mumbai-Pune) द्रुतगती मार्गावर अतिरिक्त मार्गिकेच्या कामाचा अंदाज खासगी प्रवासी चालकाला न आल्याने बस पलटी झाली. हा अपघात खालापूर क्षेत्रात खोपोली बाह्य मार्गावर घडला आहे.या अपघातात चालकासह एकूण सहा प्रवासी जखमी झाले. [ads id="ads2"]
एसआरएस(SRS) कंपनीची बस बुधवारी रात्री मुंबईहून पुण्याकडे निघाली होती. बसमध्ये २० प्रवासी होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास खालापूर क्षेत्रात खोपोली बाह्य मार्गानजीक अतिरिक्त मार्गिकेचे काम सुरू आहे. वेगात बस घेऊन जाणारा चालक यल्लाप्पा यमनाप्पा वाळद (रा. कोडलीवाड-बेळगाव) याला लेनच्या कामाचा अंदाज न आल्याने बस पलटी झाली. [ads id="ads1"]
या अपघातात बसमधील प्रवासी संदीप हनुमंत पोटे (वय ५०), प्रभा हनुमंत पोटे (७०), संगीता दयानंद पाटील (४८ तिघे, रा. मिरा रोड, ठाणे), सुरेखा सुधीनाथ शंकर गौडा (६२), मधू सुधीनाथ शंकर गौडा (३२. दोघी रा. ऐरोली), गीता लक्ष्मण गवळी (धारवाड-कर्नाटक) जखमी झाले.


