[ads id="ads2"]
यावल - तालुका हा आदीवासी क्षेत्र असुन तालुक्यातील विविध गाव हे सातपुडा पर्वताच्या कुशीत तर काही गावे हे पायथ्याशी असुन यात आदीवासी बांधवांची लोकसंख्या मोठी आहे. त्यांच्या बेरोजगारीचा गैरफायदा घेत कारखानदाराच्या हाताखाली असलेल्या या परिसरातील काही दलालांच्या माध्यमातुन मराठवाडा विभागातुन काही
[ads id="ads1"]
साखर कारखान्यांचे दलाल हे संगनमताने त्यांना रोजगाराचे आमीष दाखवितात. स्वत:चे आर्थिक हित साध्य करण्यासाठी गोरगरीब आदीवासी वाडया वस्तींवर अशा दलालांच्या मध्यस्थीने जावुन त्यांना मोलमजुरी देण्याच्या नांवावर त्यांची ट्रक व इतर वाहनाव्दारे मराठवाडा व इतर ठिकाणी सुरू होणार्या साखर कारखान्यांच्या ठीकाणी महिला मुलबाळ सहित त्यांना गुराढोरांसारखे ट्रक आत भरून पाठवण्यात येते.
अशा प्रकारे कारखानदारीच्या गळीत हंगामाच्या नांवाखाली आदीवासी मजुरांची कुणालाही अधिकृतरित्या सुचना किंवा नोंदणी न करता मजुरी देण्याच्या नांवाखाली आदीवासी गोरगरीब लोकांची आर्थिक व मानसिक फसवणुक करण्यात येत असते. यात अनेक आदिवासी बांधवांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर विषयाकडे जागृत आदीवासी समाजसेवी संघटनांनी लक्ष देऊन हा प्रकार थांबवावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.मात्र स्थानिक प्रशासनाचा याकडे दुर्लक्ष दिसुन येत आहे.