रावेर, यावल, फैजपूर, भुसावळसह ६ नगरपालिका स्वबळावर लढविणार- अनिल चौधरी ; फैजपूरात शेकडो युवा कार्यकर्त्यांचा अनिल चौधरींच्या उपस्थितीत प्रहार मध्ये प्रवेश

अनामित

[ads id="ads2"]

रावेर -  फैजपूर येथील विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चुभाऊ कडू आणि उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.अनिल चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रहार जनशक्ती पार्टी मध्ये प्रवेश घेतला असून इतर सर्व पक्षांचा अनुभव घेतला असता न्यायिक वागणूक न मिळाल्यामुळे सन्मानाचे राजकारण करण्यासाठी आपण प्रहार मध्ये प्रवेश करीत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
   [ads id="ads1"]
  या वेळी अनिल चौधरी म्हणाले आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या विचारांवर विश्वास ठेवून तळागाळातल्या लोकांना न्याय देण्यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्यासाठी प्रहार जनशक्ती पार्टी हा एकमेव पक्ष सक्षम आहे, त्यासाठी सर्व युवक प्रहार जनशक्ती पार्टी मध्ये प्रवेश करीत आहेत असे प्रतिपादन अनिल चौधरी यांनी केले. आजच्या बैठकीमध्ये  पुढे येऊ घातलेल्या निवडणुका संदर्भात चर्चा करून पक्षाचे ध्येयधोरण आदेश सर्वांनी मान्य करायचा असा एकमत ठराव आपण सर्वानी करावे हि नवीन कार्यकर्त्यांनी सूचना दिल्या.
   
    याप्रसंगी प्रहार जिल्हाउपाध्यक्ष संजय आवटे, रावेर यावल विधानक्षेत्र प्रमुख आलिम शेख, रावेर तालुकाध्यक्ष पिंटू धांडे, यावल युवक तालुकाध्यक्ष सागर तायडे, मोहसीम शेख, विक्की काकडे, बंटी मंडवाले, सचिन कोळी, पिंटू मंडवाले, रवी महाजन, सोहेब खान व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
        
  यावेळी प्रहार जनशक्ती पार्टीची युवक आघाडीची व अल्पसंख्याक आघाडीची कार्यकारिणी जाहीर जाहीर करण्यात आली असून प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारींना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!