रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) शहरातील जुना सावदा रोड वर असलेला पुल जीर्ण झाला आहे. त्या वरिल वाहतुक ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नविन नागरी वसाहती देखील मोठ्या संख्येने वाढल्या आहेत. परंतू येथील पुल हा अत्यंत जीर्ण अवस्थेत असून ऊंची देखील खुप कमी आहे.
[ads id="ads1"]
पावसाळ्याचे पाणी पुलावरून वाहते. पाण्याद्वारे वाहून येणारा कचरा पुलावर जमलेला असतो. पुलाचे नुतनीकरण करण्यात यावे व पुलाची ऊंची वाढवावी या मागणीचे लेखी निवेदन निवासी नायब तहसिलदार संजय तायडे यांना देण्यात आले.
[ads id="ads2"]
यावेळी रविंद्र दिनकर पाटील, प्रतिक खराले, महेश महाजन, नरेंद्र महाजन, मयुर डहाके, प्रविण खिरवडकर, संतोष पाटील, राजेंद्र चौधरी, दिपक महाजन, किरण पाटील, बंटी चौधरी व नागरिक उपस्थित होते.