बोरावलच्या तरुणाचा तापी नदी पात्रात पाण्यात बुडून मृत्यु .

अनामित
[ads id="ads2"]
यावल वार्ताहर (सुरेश पाटील) तालुक्यातील बोरावल येथील36 वर्षीय तरूणाचा तापी नदी पात्रात पाय घसरून पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल दि.29 शुक्रवार दुपारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
[ads id="ads1"]
           योगेश देवराम शंकोपाळ वय36रा.बोरावल ता.यावल असे मयत तरूणाचे नाव आहे.यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश शांकोपाळ हे परिवारसह राहतात.शेळगाव बॅरेज येथे डंपरवर चालक म्हणून काम करतात.दररोज सकाळी 7 वाजेच्या दरम्यान त्याची दुचाकी तापी नदीच्या किनाऱ्यावर लावून तेथुन पोहत पोहत नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जावून कामाला जात असे.

नेहमीप्रमाणे गुरूवारी दि.28ऑक्टोबर रोजी योगेश दुचाकी भालशिव येथील तापी नदीच्या काठी दुचाकी लावून दुसऱ्या किनाऱ्याकडे जात असतांना अचानक बुडला.या संदर्भात योगेश पत्नीने योगेशसी संपर्क केला परंतू संपर्क होवून शकला नाही.त्यानंतर योगेशच्या नातेवाईकांनी भालशिव परिसरात शोध घेतला असता दुचाकी आढळून आली परंतू योगेश दिसून आला नाही.दरम्यान काल शुक्रवार29ऑक्टोबर रोजी दुपारी 4:30वाजेच्या सुमारास भालशिव गावाजवळ योगेशचा मृतदेह आढळला.

नातेवाईकांनी मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणला.वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले.याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!