[ads id="ads2"]
यावल - फैजपूर शहर जवळील हंबर्डी येथे उसनवारीने पैसे न दिल्याच्या शुल्क कारणावरून तिन जणांनी एका महेश नामक तरूणाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार यावल तालुक्यातील हंबर्डी येथे घडला. संबंधित प्रकरणी यावल तालुक्यातील फैजपूर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[ads id="ads1"]
महेश सूपडू सावकारे (३० - रा. हंबर्डी ता. यावल जि.जळगाव) हे दिनांक २४ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे गावात फिरत असतांना तडवी वाड्यात गप्पा मारत बसले होते तेव्हा गावातील सलदार बलदार तडवी हा येवून महेशकडे उसनवारीने पैस्यांची मागणी केली. यादरम्यान महेशने पैसे देण्यास नकार दिल्याने सलदार बलदार तडवी, शावखॉ लालखॉ तडवी आणि लुकमान शावखॉ तडवी (रा. हंबर्डी ता. यावल) या तिघांनी लाकडी दांडक्याने महेश ला बेदम मारहाण केली. यात महेश यांच्या हाताल मार बसल्याने जखमी झाले आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तीघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर पोलिस करीत आहेत
