रावेर प्रतिनिधी : आजवर तब्बल १८ लाख रुग्णांवर मुंबई,पुणे,औरंगाबाद,नागपूर अशा महत्वाच्या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया करून देणारे,रक्तदानाचे शतक पार करणारे भारतातील पहिले आमदार, चार वेळा अपक्ष आमदार तथा राज्य मंत्रीमंडळात सहा खात्यांचे राज्यमंत्री म्हणून यशस्वी पणे कारभार सांभाळणारे नेहमी [ads id="ads2"] शेतकरी,अपंग,विधवा महिला,शेतमजूर,अनाथ अश्या सर्व घटकातील व्यक्तींसाठी नेहमी मदत करणारे राज्यमंत्री ना.बच्चू भाऊ कडू यांच्या कार्याने व कार्यशैलीने प्रभावित होऊन तसेच उ.म.अध्यक्ष श्री.अनिल भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व युवा जिल्हा प्रमुख अविनाश भाऊ पाटील,तालुका प्रमुख दुर्गादास उर्फ पिंटू भाऊ धांडे आणि तालुका युवा प्रमुख योगेश भाऊ निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तालुक्यातील पाल, कुसुंबा व खानापूर येथील काँग्रेस समर्थक युवक वर्गाने रेस्ट हाऊस येथे जाहीर प्रवेश केला.[ads id="ads1"]
यात नवनिर्वाचित सदस्यांनी बोलतांना सांगितले की, आजवर आमचा फक्त आणि फक्त मतदानापूर्ती वापर केला गेला आम्हाला नुसता आश्वासने दिली गेलीत प्रत्यक्षात आश्वासन पूर्ण केली नाहीत तसेच बच्चू भाऊंची काम करण्याची पद्धत आम्ही सोशल मीडिया च्या माध्यमातून आणि वर्तमान पत्रातून बघण्यात व वाचण्यात आलेली आहे म्हणून आम्ही प्रहार मध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे.
या प्रसंगी प्रहार सेवक राजू भाऊ पाटील,मच्छिंद्र कोळी, तय्युब तडवी, महेंद्र बोरनारे व कार्यकर्ते उपस्थित होते.