वैशाली संतोष कोळी असे मृत विवाहितेचे नाव आहे. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केले जात असून मारवड पाेलिसांत नाेंद करण्यात आली आहे.
याबाबत असे कि, गावात पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर वैशाली कोळी यांनी पंप सुरू केला. वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यांनी पंपाची पिन काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अचानक वीज आल्यामुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेनंतर त्या जागीच कोसळल्या. ही घटना शेजारील महिलांच्या लक्षात आली. त्यानंतर तरुणांनी महिलेला खासगी रुग्णालयात हलवले. [ads id="ads1"]
तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात डॉ.जी.एम.पाटील यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. मृत विवाहितेच्या पश्चात सासू, सासरे, पती, दीर, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्या पाणीपुरवठा कर्मचारी सुखदेव कोळी यांच्या सून, तर पाडळसरे धरणावरील वीज कर्मचारी संतोष कोळी यांच्या पत्नी होत. मारवड पाेलिसांत नाेंद करण्यात आली आहे.


