पत्रकार राहुल जैन यांच्या वाढदिवसा निमित्त फराळाचे वाटप

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  तामसवाडी ता.रावेर प्रतिनिधि (राजेश  रायमळे) राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे रावेर तालुका सचिव व दैनिक महाराष्ट्र सारथीचे रावेर विभागीय कार्यालयीन व्यवस्थापक पत्रकार राहुल जैन यांच्या वाढदिवसा निमित्ताने आदिवासी पाड्यावर दिवाळी  फराळाचे वाटप करण्यात आले .[ads id="ads2"] 

          याबाबत सविस्तर वृत्त असे कि जुना तामसवाडी रोड येथील स्टोन क्रेशर वर राबणाऱ्या आदिवासी मजुरांच्या पाड्यावर जाऊन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ रावेर तालुका सचिव तसेच दैनिक महाराष्ट्र सारथीचे रावेर विभागीय कार्यालयीन व्यवस्थापक झुंजार पत्रकार  राहुलभाऊ जैन  यांच्या वाढदिवसा निमित्त पाड्यावर स्थित गरीब आदिवासी मजुरांच्या मुलांना दिवाळीचे फराळ वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक दैनिक महाराष्ट्र सारथीचे तालुका प्रतिनिधी प्रदीपजी महाराज पंजाबी, संघाचे तालुका अध्यक्ष योगेश पाटील, तालुका संपर्क प्रमुख राजेश रायमळे,तालुका उपाध्यक्ष संतोष पाटील, तालुका संघटक ईश्वर महाजन आदींनी मनोगत व्यक्त केले.

युवासेना तालुका सचिव जयेश पाटील आणि युवासेना तालुका सोशल मिडिया प्रमुख कैलास पाचपोहे  आदींच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!