एस.टी. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार...

अनामित
[ads id="ads2"]
मुंबई - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून परिवहन महामंडळातील एस.टी. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून ११२ कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी दिले.
[ads id="ads1"]
 त्यानुसार आज तातडीने निधी वितरीत करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो एस. टी. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत झाले पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. कोरोना संकट काळात एस.टी. कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा बजावली असून सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या परिवहन महामंडळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही अजित दिली. 

दरम्यान, कोरोना संकटकाळात टाळेबंदीची परिस्थिती निर्माण झाल्याने एस.टी. च्या वाहतुकीवर परिणाम झाल्याने परिवहन महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. परिणामी पगारासाठी निधीची कमतरता निर्माण झाली होती. या कठीण परिस्थितीचा विचार करता परिवहन महामंडळाला तातडीने निधी वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले व त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!