जळगाव, (सुवर्ण दिप वृत्तसेवा) - जिल्ह्यात पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 27 ते 29 ऑक्टोबर, 2021 दरम्यान आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील उद्योजकांनी एसएससी/एचएससी/पदवीधर/पदविकाधारक/एमई/बीई/कॉम्प्युटर ऑपरेटर/ आय.टी.आय सर्व ट्रेड पात्रतेची एकूण 205 रिक्तपदे भरण्याविषयी कळविलेले आहे. अशी माहिती वि. जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. [ads id="ads2"]
या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या ईच्छूक उमेदवारांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्डने लॉगईन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नांव नोंदणी करावी व तद्नंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉगईन करुन ॲप्लाय करावा.
याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा, त्याचप्रमाणे मेळावा ऑनलाईन असल्याने उमेदवारांनी कार्यालयात अथवा नियोक्याकडे उक्त नमूद कालावधीत प्रत्यक्ष उपस्थित राहू नये, असेही श्री. मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

