[ads id="ads2"]
यावल वार्ताहर (सुरेश पाटील) फैजपूर नगरपरिषदेने केलेल्या कामांचे बिल देण्यासाठी फिर्यादी ठेकेदार सचिन भोंबे यास बिल देण्यासाठी खंडणी मागितली आणि ती खंडणी न दिल्यामुळे तत्कालीन मुख्य अधिकारी सुवर्णा उगले शिंदे,नगराध्यक्षा महानंदा रवींद्र टेकाम,नगरसेवक कलिमखा हैदारखा मणियार, हेमराज खुशाल चौधरी उर्फ डालु शेठ,रशीद नशिर तडवी,मिलिंद शंकर वाघुळदे,
[ads id="ads1"]
शेख कुर्बान शेख याकूब यांनी फौजदारी कट रचून ठेकेदारास काळ्या यादीत टाकून बदनामी केल्यामुळे त्यांनी यावल न्यायालयात सन2019 मध्ये तक्रार केली होती.त्यावर दि. 18/10/2021रोजी यावल न्यायालयाने भा.द.वी.कलम 385, 463, 464, 465, 469, 470, 471, 499,120B व 511 प्रमाणे प्रोसेस इश्यु केलेने संपूर्ण राजकीय क्षेत्रात नगरपरिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.याकामी तक्रारदार सचिन भोंबे यांचे तर्फे अड.व्हि.एच्. पाटील जळगाव यांनी काम पाहिले.