मुक्ताईनगर प्रतिनिधी
सविस्तर वृत्त असे कि,बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क द्वारे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून साडेपाच हजार तालुक्यांमध्ये धम्मरॅलीचे आयोजन करण्यात आले होते,त्याचाच एक भाग म्हणुन मुक्ताईनगर शहरात सुद्धा मा.रमेश बोदडे सर यांचे नेतृत्वाखाली हि धम्मरॅली संपन्न झाली,सर्वप्रथम प्रवर्तन चौकांत फुले शाहु आंबेडकर पुतळ्यांना महीला प्रतिनिधींकडून फुलहार अर्पण करून,मानवंदना देऊन त्रिसरण पंचशील ग्रहण केले व तिथुन भाजी बाजारातुन प्रशिक नगर व प्रशिक नगर मधुन आंबेडकर नगर च्या धम्मानंद बूद्ध विहारात या रॅलीचे समापन झाले,मंगलमैत्रीच्या सुरामध्ये ही रॅली काढण्यात आली,[ads id="ads2"]
नंतर विहारात शुभेच्छापर भाषणे झालीत, लोकशाही चे पत्रकार मा.मोहन मेढे,मा.बि.डी.गवई,मा.अॅड.कुणाल गवई, बहुजन मुक्ती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष मा.प्रमोद पोहेकर,बामसेफचे कार्यकर्ते मा.मनोज पोहेकर,माजी पोलीस उपनिरीक्षक मा.श्रिराम पोहेकर यांनी मनोगत व्यक्त केले,त्यानंतर बामसेफचे पुर्णकालीक प्रचारक मा.नितिन गाढे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व सांगितले,धम्मप्रसारक मा.सारिपुत्र गाढे सर यांनी सुत्रसंचालन केले,मा.संगिताताई सोनवणे यांचे नेतृत्वाखाली जास्तीत जास्त महीलांचा सहभाग होता,प्रसंगी मा.सुरेश चव्हाण, बहुजन क्रांती मोर्चा चे मा.प्रमोद सौंदळे, संभाजी ब्रिगेड चे मा.मंगेश काटे,मा.वाहुळे सर,गौतम वाघ, तहसील कार्यालयातील सेवानिवृत्त जगदेव इंगळे,धिरज बोरकर, लहुजी क्रांती मोर्चा चे तालुकाध्यक्ष मा.राजेश ढगे,मा.शेख असगर,मा.पुना इंगळे, निखिल पोहेकर, राष्ट्रीय किसान मोर्चा चे तालुकाध्यक्ष कैलास पाटिल, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर धायडे,मौर्य क्रांती संघाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र सावळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.[ads id="ads1"]
या धम्मरॅलीत भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी, मौर्य क्रांती संघ, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा,संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय किसान मोर्चा, छत्रपती क्रांती सेना च्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला,अशा पद्धतीने हि धम्मरॅली यशस्वी ठरली.

