रस्ता बंद केल्याने लेआउट धारकावर गुन्हा दाखल करा - अतुल पाटील

अनामित

यावल वार्ताहर (सुरेश पाटील) यावल नगरपरिषद हद्दीतील यावल फैजपूर रोडवरील गट क्र. 46 माधवनगर मधील मुख्यरस्ता संबंधित लेआउट धारकाने बंद केल्याने तसेच गटारीची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे 
[ads id="ads1"]
त्यामुळे लेआउट धारकावर गुन्हा दाखल करून रस्ता पूर्ववत सुरू करावा अशी लेखी तक्रार तथा मागणी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आणि गटनेते अतुल पाटील यांनी यावल नगरपालिका मुख्याधिकाऱ्याकडे केली 
[ads id="ads2"]
तसेच 8 दिवसात कार्यवाही न केल्यास रहिवाशांसह यावल नगरपालिके समोर उपोषण करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
       
   अतुल पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गट क्रमांक 46 मधील माधवनगर मधील मुख्य रस्ता गेल्या 35 वर्षापासून सार्वजनिक रित्या वापरला जात होता.विरारनगर,गणेशनगर, एकरानगर,रजानगर भागातील रहिवाशांसाठी नगररचना विभागाने हा रस्ता मंजूर केला आहे मात्र गेल्या आठवड्यात 'ले'आउट धारकाने लोखंडी अँगल गाडून टाकून हा रस्ता बंद केला. रस्त्याला लागून नगरपालिकेने बांधलेल्या गटारीची तोडफोड करून त्या ठिकाणी मातीचा भराव टाकून गटार व रस्ता बंद केली.त्यामुळे त्या भागातील रहिवाशांना नागरिकांना दुसऱ्या रस्त्याने फेऱ्याने जा- ये करावी लागत आहे या रस्त्यावर या पूर्वी पालिकेने डांबरीकरण करून पथ दिव्यांसाठी वीज खांब उभे केले  आहे मात्र ले आउट धारकाने सार्वजनिक रस्ता बंद केल्याने परिसरातील रहिवाशांचे हाल होत आहेत.या प्रकरणी संबंधित 'ले' आउट धारकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी गटनेते अतुल पाटील यांनी यावल नगर परिषद मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांच्याकडे केली तसेच 8 दिवसात कार्यवाही न झाल्यास यावल नगरपालिकेसमोर उपोषण  करण्यात येईल असा इशारा सुद्धा अतुल पाटील यांनी दिला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!