Yawal Breaking - कायद्याचे पालन करा नाही तर गुन्हे दाखल होतील; पुढील वर्षी गणपती दुर्गोत्सवला राहायचे नाही.शांतता समितीमध्ये इशारा. पो.नि.सुधीर पाटील.

अनामित

यावल वार्ताहर (सुरेश पाटील) दुर्गोत्सव साजरा करताना कायद्याचे पालन करा अन्यथा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील.तसेच मला पुढील वर्षी गणपती,दुर्गोत्सवला हजर राहायचे नाही.असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी उपस्थित सर्व शांतता समिती सदस्यांना व दुर्गोत्सव मंडळाना दिला आहे.
[ads id="ads2"]
      काल दि.6बुधवार रोजी संध्याकाळी5वाजता यावल पोलीस स्टेशनआवारात शांतता समिती सदस्य व दुर्गोत्सव मंडळ सदस्यांची बैठक झाली.दुर्गोंत्सव साजरा करताना लाऊड स्पीकर, मिरवणूक,गरबा,दांडिया इत्यादी सार्वजनिक कार्यक्रमांना शासनाच्या आदेशानुसार परवानगी नाही.देवीची आरती करताना फक्त5जणांना उपस्थित राहता येईल,दुर्गोंत्सव मंडळातील सदस्यांना दुर्गोंत्सव साजरा करताना रक्तदान शिबीर,आरोग्य शिबीर घेता येतील.

दुर्गोत्सव मंडपात लहान,छोटे कमी आवाजाचे स्पीकर ठेवण्याची वैयक्तिक परवानगी देत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली.यावेळी मंडळातील सदस्यांनी वीज पुरवठा सुरळीत ठेवणे बाबत मागणी केलीअसता वीज मंडळाचे शाखा अभियंता महेश वावरे यांनी वीज पुरवठा बाबत दक्षता घेतली जाईल असे आश्वासन दिले.[ads id="ads1"]यावेळी यावल नगरपरिषदेचा कोणीही जबाबदार प्रतिनिधी उपस्थित नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.
    
 शांतता समिती बैठकीत काँग्रेसचे पदाधिकारी भगतसिंग पाटील,काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी हाजी शब्बीर सेठ,शेखर पाटील,अमोल भिरुड,अनिल जंजाळे,गोपालसिंग पाटील,विजय सराफ,यावल येथील मनुदेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष फेगडे,प्रगतशील शेतकरी प्रमोद नेमाडे,हाजी गुलाम रसूल,हाजी ताहेर सेठ,माजी नगराध्यक्ष चंद्रकांतदादा देशमुख, भाजप शहराध्यक्ष निलेश गडे, परेश नाईक,भूषण नेमाडे,भूषण फेगडे,एम.बी.तडवी सर इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते,शांतता समिती सदस्य उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!