जयभीम चा जयघोष क्रांतीचा नारा आहे,तो प्रकाशाकडून प्रकाशाकडेच जाणारा राजमार्ग आहे.कारण हा प्रकाशमान अशा सद्धम्माच्या दिशेने जाणारा मार्ग आहे. संपूर्ण जगाचे कल्याण ज्यामध्ये सामावलेले आहे अशा कल्याणकारक सध्दम्माचा शोध तथागत बुद्धांनीच लावला.सिद्धार्थ गौतमाला बोधी प्राप्ती होण्यापूर्वी कपिलवस्तू मध्ये कदाचित धम्माचा अभाव होता,कारण तसे नसते तर सिद्धार्थ गौतमाला त्याच्या शोधात जावेच लागले नसते. [ads id="ads2"]
तथागत बुद्धांच्या याच कल्याणकारक धम्माने जगातील अज्ञान रूपी अंधकार नष्ट करून ज्ञानरूपी धम्मप्रकाश जगाला दिला. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सिध्दार्थ गौतम सम्यक संबुध्द झाले. शुद्धोधनाच्या विनंतीला मान देऊन ते कपिलवसतूत आले. [ads id="ads1"]
.आणि तेथे धम्म देसना देऊन आपल्या कल्याणकारी धम्मप्रकाशाने कपिलवस्तू नगरी उजळवून काढली.धम्माचे एक मोठे वैशिष्ट्य असे आहे की,जो तो ग्रहण करतो तो धम्माला गतिमान करण्यासाठीच झटत असतो.कारण हा कल्याणकारी धम्ममानवासाठी,त्याच्याआरोग्यासाठी,परिवारासाठी,देशासाठी आणि एकुणच सृष्टीतील प्रत्येकासाठी कल्याणकारी आहे.म्हणून ज्याने धम्म स्वीकारला त्याचे आद्य कल्याण,मध्य कल्याण आणि अंतही कल्याणच आहे.सुगीच्या दिवसांत धनधान्य मुबलक असते,पाणीही भरपूर असते आणि ओला चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो.
त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच त्यांची गुरे ढोरे देखील आनंदात असतात. खरंतर सुगीचे दिवस म्हणजे शेतात राबणाऱ्या प्रत्येकासाठी आनंदाचे दिवस. कारण वर्षभर मोठ्या कष्टाने मेहनत करून शेतात पिकवलेलं सोनं घरी आणायचे ते दिवस असतात. तर अशा सुगीच्या दिवसातच तथागतांना कपिलवस्तूचे निमंत्रण आले.तेव्हा तथागत येणार म्हणून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी चालू झाली.एखादी मोठी पदवी प्राप्त करून आल्यानंतर जशी जय्यत तयारी करतात अगदी तशीच ती जय्यत तयारी चालू होती. सिध्दार्थ गौतम आता साधारण व्यक्ती राहीले नव्हते, तर ते संम्यक संबुध्द झाले होते.
आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा ऊत्सव काळ असतो बर्याच ऊत्सवांची शृंखला या कळात असते बुद्ध कपिलवस्तूत आले तो दिवस कार्तिक अमावसेचा होता.धनधान्य तेळस व भिक्षुच्या स्वागताची तयारी जोमात चालू होती.पूर्वी धन नव्हते धान्य शब्द प्रचलित होता.गहू,तांदूळ तीळ असे धान्य होते.अमावसेच्या आदल्या रात्री काळी चावदस (चतुर्दशीला सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करून पिकाच्या पहिल्याच धान्याचे सहद (मध),गुळ, तीळ मिसळून चविष्ट सुगंधित गोडधोड पदार्थांचे सेवन करतात त्याआधी कुलमाता स्तुती केली जाते.अशा या मंगल समयी संम्यक संबुध्द यांचे कपिलवस्तू नगरीत आगमन होत असल्यामुळे नगर वासियांच्या आनंदाला सिमाच ऊरली नाही.कार्तिक अमावसेला तथागतांनी कपिलवस्तू वासियांना कल्याणकारक धम्मप्रकाश दिला.
तेव्हा नगरवासियांनी कार्तिक अमावस्येच्या दिवशी कपिलवस्तू नगरीत हा प्रकाशमान धम्म अधिकाधिक प्रकाशमान होणेकामी दिवे जाळले पूर्ण कपिलवस्तू नगर धम्म प्रकाशाने उजळवून प्रकाशपर्व साजरे केले.अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री,तसेच कपिलवस्तू नगरवसियांचा अज्ञान रूपी अंधकार नष्ट करून ज्ञान रूपी धम्म प्रकाश देवून तथागतांनी नगर वासियांच्या जीवनातील अंधकार कायमचा नष्ट करून भयमुक्त केले.अंधकार मुक्त अर्थात भयमुक्त झाल्यामुळे कार्तिक अमावस्येच्या दुसर्या दिवशी "भयदस्सदिसो"(भयमुक्त दिवस) साजरा करतात.या दिवशी माता भगिनीं मोठ्या प्रमाणात ऊत्साही असतात.
अशाप्रकारे बौध्द धम्म जे समतेचं प्रतीक आहे या धम्मात कार्तिक अमावस्या अर्थात दीपदानोत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे.जगभरातील ईतर धर्मांच्या तुलनेत बौध्द धम्मचे स्थान वेगळे आहे कारण बौद्ध धम्म हा वैज्ञानिक दृष्टिकोण असणारा धम्म आहे जो नाक, कान, जीभ,त्वचा,आणि डोळे या पंच ज्ञानेंद्रियां मार्फत प्राप्त ज्ञानावरच विश्वास ठेवतो असा हा प्रज्ञाप्रीय सद्धम्म आहे.आणि प्रत्येक गोष्ट बुध्दीच्या कसोटिवर घासूनपुसून तर्क शुद्ध आकलन करतो.असाच तो सध्दम्म आहे.सम्रट अशोकाने शस्त्र नाकारून बौध्द धम्म स्वीकारत धम्मचक्र गतिमान केले तो दिवस अशोका विजयादशमी म्हणून ओळखतात धम्मचक्र परिवर्तनानंतर अशोकाने संपुर्ण आशिया खंडात बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, सम्राट अशोकाने संपूर्ण आशिया खंडात पसरलेल्या आपल्या साम्राज्यात ८४००० बौध्द स्तूप शिलालेख स्तंभ ईत्यादी बनवून कार्तिक अमावस्येच्या रात्री सर्वत्र दिवे लावून संपूर्ण आशिया खंड प्रज्वलित केला.
तेव्हापासून चालत आलेला हा दिपदानोत्सव आहे.असे हे धम्मप्रकाश पर्व आनंदाचे प्रतीक तर आहेच मात्र याच दिवशी काही अघटीत दु:खद घटणा देखील घडलेल्या आहेत नव्हे तर कदाचित घडवूनही आणलेल्या असाव्यात त्या अशा सारिपुत्त आणि महामोग्गलान यांच्यावर तथागत गौतम बुद्धांनी संघाची धुरा सोपविली होती. त्यांनी ४४ वर्षे धम्मसेवा केली. सारिपुत्ताचे परिनिर्वाण कार्तिक पौर्णिमेला झाले. पंधरा दिवसांनी कार्तिक अमावस्येला ईसिगिल पर्वतावर महामोग्ग्गलानची क्रूर हत्या करण्यात आली. तो दिवस कार्तिक अमावस्येचा होता.मौर्य कुळातील शेवटचा बौद्ध राजा बृहद्रथ यांची ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शुंग याने कपटकारस्थानाने क्रूर हत्या केली.
तोही दिवस कार्तिक अमावस्येचा होता. बौद्ध सत्ता उलथून लावण्यात आली. भिक्खूंच्या कत्तली करण्यात आल्या. भिक्खूंचे शिर कापून आणणाऱ्यास १०० सुवर्ण मुद्रा देण्याचे फर्मान पुष्यमित्र शुंगाने सोडले. विहारे, संथागारे नष्ट केली. तो दिवस कार्तिक अमावस्येचाच होता.बहुजनांचा सर्वश्रेष्ठ राजा बळी याला विष्णूने कपटकारस्थान रचून कैद केले. त्याच्या शूरवीर मुलांना कैद केले. त्यांची सत्ता, शस्त्रे, विद्या, संपत्ती हिरावून घेण्यात आली. त्यांच्या मुलांना एकामागून एक ठार करण्यात आले. बलीप्रतिपदा या दिवशी बळी राजाची क्रूर हत्या करण्यात आली. तो दिवसही कार्तिक अमावस्येचाच होता.म्हणून बौद्धांनी, अथवा बहुजनांनी हा ऊत्सव साजरा करावा की,करू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो.मात्र माझे वैयक्तिक मत या बाबत असेच आहे की, घरावर विद्युत रोषणाई करणे, आकाश कंदील लावणे, दिवे लावणे, रांगोळी काढणे, नवीन कपडे परिधान करणे, मिष्ठान्न करणे म्हणजे आपल्या पूर्वजांच्या महापुरुषांच्या हत्येत सहभागी झाल्यासारखेच आहे.नाही तरी आजच्या घडीला या ऊत्सवाला ऊत्सवपणच राहीले नाही.आजचा उत्सवप्रिय समाज डाॅ.नरेंद्र दाभोलकरांच्या म्हणण्यानुसार अकलेचा धूर, आणि पैशाची राख करण्यातच धन्यता मानतात.व्यापारी वर्गाचा पूर्ण वर्षभराचा व्यवसाय याच दिवशी होतो असे म्हटले तरी चालेल कारण लोकं खुप उन्मादात असतात अधिकाधिक पैसा खर्च करण्याच्या तयारीत असतात, ऊत्सवप्रीय समाजाची विचार शक्ती संपून लोकं मानसिक गुलाम बनतात आणि मेहनतीने कमावलेला पैसा ते मोकळ्या हाताने पाण्यासारखा खर्च करतात. लोकं उसनवार पैसा घेऊन व्यापाऱ्यांकडून नकद माल खरेदी करतात. व्यापारी खूप मोठ्या प्रमाणावर पैसा कमवतात घेतलेला माल दुप्पट भावात विकतात पूर्ण बाजार गजबलेला असतो कोणती वस्तू कितीला आली व ती कीतीमध्ये विकली गेली कोणी कोणाला विचारत नाही अगदी वेडसरपणे मेहनतीचा पैसा देखाव्यामध्ये घालवला जातो.असे अनेक सण ऊतसव आहेत ज्यांच्यामध्ये उत्सवप्रिय समाज गुरफटलेला आहे.पुरोहित वर्ग यात प्रत्यक्ष सहभाग घेत नाहीत, पुजा अर्चा मात्र त्यांच्याशिवाय होत नाहीत.अलीकडे आजची तरुण पिढी सण ऊत्सवांच्या मूळ हेतूपासून अलिप्त राहून हौसे नवसे गौसे यांमध्ये सहभागी होऊन खाओ पिओ मजा करो अशा वृत्तीची झाली आहे.याचाच फायदा व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. त्यामुळे दुकानदार आणि व्यावसायिकांसाठी हे सण ऊतसव खूप चांगले आहेत.
कारण त्यातून ते नफा कमवतात. याच्या उलट जनसामान्यांसाठी ते नुकसानकारकच आहेत. त्यामुळे जनसामान्यांनी शक्यतोवर ऊतसव काळात खरेदी टाळावी ऊत्सवाच्या आधी कींवा नंतर बाजार स्वस्त असतो तेव्हा खरेदी करणे योग्य असते.पण ऊत्सवप्रीय समाज याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत नाही, ही एकप्रकारे बौध्दीक दिवाळखोरीच आहे.आणखी महत्वाचे म्हणजेच
शरदऋतूच्या मध्यावर आश्विन आणि कार्तिक यांच्या संधीकाली दशदिशा उजळून टाकणारा दीपदानोत्सव हा तथागत बुद्धांच्या काळापासून सुरु झालेल्या या दिपदानोत्सवाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे. धन, धान्य आरोग्य शांती साठी साजरा होणारा हा ऊत्सव. मात्र, फटाके आणि अटमबॉम्ब . यांच्यामुळे मानवी जीवन आणि पर्यावरणाची हानीच करित आहे. आवाजाची पातळी साठ डेसिबलच्या वर गेली की माणसाला त्रास होतो. सुटळी बॉम्ब, डांबरी माळा यांचीदेखील पातळी नेहमीच शंभरच्या वर असते. या ध्वनीप्रदूषणामुळे रक्तदाबात वाढ, चीडचीड, मानसिक ताण, श्रवणदोष इत्यादी दुष्परिणाम संभवतात. रात्री-अपरात्री उडालेल्या फटक्याने निद्रानाश होतो. लहान मुले, वयोवृद्ध रुग्ण यांचा जीव घाबरतो. अभ्यासात व्यत्यय येतो. अनेक पशुपक्षी घाबरून सैरावैरा पळताना मृत्युमुखी पडतात. वाहन चालवणारी माणसे दचकून अपघात होतात.
फटाक्यांतील रसायनांमुळे कार्बन मोनोक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड, माग्नेशियम पेंटाक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड इत्यादी विषारी वायू व माग्नेशियम, सल्फर, फोस्फरस, कार्बन ट्रायनायट्रोटोल्यून इत्यादींच्या धनकणिका वातावरणात मिसळतात. त्यामुळे व विषारी वायूंमुळे दमा, खोकला, अलर्जी, डोकेदुखी, दृष्टी मंदावणे, त्वचारोग, कर्करोग, वाढता रक्तदाब, मतीमंदत्व, मज्जातंतूवर परिणाम यांपैकी काहीही होऊ शकते. तात्पुरता क्षणिक आनंद मिळवण्यासाठी जाणूनबुजून आजारांना निमंत्रण दिले जाते. फटाके उडवणे म्हणजे आगीशी खेळच असतो. फटाक्याने आग लागणे, भाजणे आणि मालमत्तेची व जीविताची हानी होणे या सर्व गोष्टी प्रतिवर्षी वाढत्या प्रमाणावर होत आहेत. फटाके करण्यासाठी कागद वापरतात, त्यासाठी हजारो झाडे तोडली जातात. फटाके फोडल्यावर कागदाच्या चिंध्या होतात, तो जळतो. म्हणजेच हजारो वृक्षांची कत्तल करून पर्यावरणाची हानी होते.
फटाक्यांच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाला कितीतरी पर्याय आहेत. मात्र, आपण स्वतःही समजून घ्यायला हवे. आपल्या मित्रांना, घरातल्या भावडांना पटवून द्यायला हवे. फटाके न फोडल्याने वाचलेल्या पैशातून छान छान असे खूप काही करता येईल. धैर्य, चतुरपणा, हुशारी, प्रामाणीकपणा अंगी येण्यासाठी गोष्टींची पुस्तके घेता येतील. विज्ञानाचे खेळ घेता येतील. मुलांना खूप छान कागद, पेन्सील, रंग देऊन आकाशकंदिल तसेच बरेच काही करता येईल. किल्ले बांधता येतील, सहल काढता येईल आणि हो याचबरोबर तुमच्यातील कळवळ्याचा माणूस जर जिवंत असेल ना, तर ज्यांच्या जीवनात हा आनंदोत्सव कधी येतच नाही ते बुटपोलिश करणारे, हॉटेलमध्ये काम करणारे, कागद भंगार गोळा करणारे, दुर्दैवाने मुकबधीर, अपंग, निराधार बनलेले तुमचे छोटे छोटे भाऊ बहिण कोठेही भेटतीलच. त्यांच्याही जीवनात प्रकाशपर्व यावे म्हणून फटाक्यांच्या वाचलेल्या पैशातून काही करू शकलात ना, तर त्यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही.मात्र या सर्व विधायक गोष्टींचा ऊत्सव प्रिय समाजाला रितसर विसर पडलेला आहे.
शेवटी तमाम भारतीय बौध्द आणि तथागत बुद्ध, व फुले शाहू आंबेडकरी विचारांचे पाईक असणाऱ्या भारत वासियांना एवढेच सांगू इच्छितो ज्या महामानवाने अज्ञान रूपी अंधकार भय नष्ट करून ज्ञान युक्त भयमुक्त आणि स्वयंप्रकाशित होण्याचा मार्ग दाखवून जगाचे कल्याण करणारा महान असा धम्म जगाला दिला,ते जगद्गुरू तथागत संम्यक संबुध्द यांची जयंती वैशाख पौर्णिमा व बारा महिन्यांच्या बारा पौर्णिमा हाच आपला प्रकाश ऊत्सव आहे,इतिहासात होऊन गेलेले अनेक परिवर्तनवादी संत महंत महामाता जीजाई भिमाई रमाई सावित्रीमाई, सकल बारा बलुतेदार अठरापगड समाज बांधवाना मावळा या एकाच मथळ्याखाली एकत्रित करून संत तुकोबाराय, शाहाजी राजे भोसले आणि आई जिजाईंच्या संकल्पनेतील स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, ज्या महामानवाने तमाम भारतीय शुद्रातिशुद्र आणि सर्वच थरांतील स्रियांच्या जीवनातील अंधकार नष्ट व्हावा म्हणून शिक्षणाचे दरवाजे केले खुले ते आधुनिक भारताचे खरे खुरे महात्मा,महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले,आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूमहाराज, भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिकाला आचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, आहार विहार मुक्त संचार स्वातंत्र्य, धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, विविध माध्यमांतून आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार बहाल करून या भारत देशावर ज्यांनी अनंत असे उपकार केले ते सुराज्य आणि पूर्ण स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते महामानव, भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार, भारत रत्न, विश्वभूषण,प्रज्ञासूर्य, परमपूज्य, बोधिसत्व बाबासाहेब डाॅ.भीमराव रामजी आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी महामानवांची जयंती हेच आपले प्रकाश पर्व आहे. आपण बौद्ध आहोत, आपली संस्कृती वेगळी आहे. आपले सण ऊतसव म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिन, २६ नोव्हेंबर, २६ जानेवारी, हेच आपले महा ऊतसव आहेत.आणि तेच तमाम बौद्ध आणि बहुजनांनी साजरे केले पाहिजेत.तेव्हाच आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस येतील. -----
ज्ञानाचा दीवा घरोघरी लावा.जयभीम जयज्योति जय क्रांती.
राजेश वसंत रायमळे(एम.ए.एल.एल.बी.)
९७६४७४२०७९

