जळगाव - AIMIM उत्तर महाराष्ट्र सचिव फिरोज शेख, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष अशरफ तडवी, माजी युवक जिल्हाध्यक्ष नावीद खान, जिल्हा सहसचिव महेमूद पठाण, कलीम शेख, माजी भुसावळ युवक शहराध्यक्ष एलियाज पटेल, भुसावळ उपतालुकाध्यक्ष अफजल खान, युवा तालुकाध्यक्ष नदीम शेख, रावेर लोकसभा सचिव वसीम शेख यांनी आज राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू, यांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ती पार्टीत जाहीर प्रवेश केला.
[ads id="ads2"]
या दरम्यान प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी गावंडे देखील उपस्थित होते अल्पसंख्याक समाजाचे प्रामाणिक, होतकरु पदाधिकारी प्रहारत प्रवेश करत असल्याबाबत बच्चु कडू यांनी समाधान व्यक्त केले.
[ads id="ads1"]
तसेच एमआयएम AIMIM यांच्या पक्ष प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाला आणखी बळकटी मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दुसऱ्यापक्षा मध्ये जुन्या नेत्यांना डावलले जात आहे. त्यातूनच जळगाव जिल्ह्यातील एमआयएम AIMIM आज आपल्या पक्षात प्रवेश करत आहे, याचा आनंद वाटत असल्याचे ते म्हणाले...
या वेळी अनिल चौधरी म्हणाले महाराष्ट्रात इतर पक्षाकडे कुठली हि विचारधारा शिल्लक नसल्यामुळे युवा वर्ग यांना कंटाळला आहे. विभाजित करणाऱ्या शक्ती ह्या जगातील कुठल्याही गोष्टींना एकसंध करू शकत नाही. आज आपल्या देशात भाजपने ह्याच विभाजित करणाऱ्या शक्तींना उधाण दिले आहे.
जळगाव जिल्ह्यातील एमआयएम AIMIM चे प्रमुख नेत्यांसोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी हि प्रहार पक्षाचे विचार स्वीकारून मोठ्या प्रमाणात प्रहारमध्ये प्रवेश केले सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन तसेच त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा...
आज मुंबई येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदार.श्री.बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या पुढाकाराने जळगाव जिल्ह्यातील एमआयएम AIMIM चे प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला..
