रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) रावेर शहरातील जनतेने सोशल मेडिया वरील अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन येथील शांतता समितीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी केले.
[ads id="ads2"]
त्रिपुरा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस स्टेशन मध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शहरात शांतता अबाधित राखण्याचे आवाहन करण्यात आले. व्हाट्स अॅप, फेसबुक, इनस्टाग्राम, टेलिग्राम, ट्विटर आदी सोशिअल मेडियावर येणा-या धार्मिक भावना भडकाविणारे फोटो व मजकूर यावर विश्वास ठेवू नका.
[ads id="ads1]
अशा चुकीच्या पोष्ट समाजकंटक पाठवत असतात व शांतता भंग करण्याचा प्रयत्न हेच निवडक समाजकंटक करत असतात. म्हणून सुज्ञ नागरिकांनी अशी पोस्ट आली तरी ती कुठेही पुढे न पाठविता त्वरित डिलीट करावी. व त्यास बळी पडू नये. असेही आवाहन श्री. नागरे यांनी केले.
भांडणे तरुण मुलेच करतात म्हणून तरुण मुलांवर अंकुश लावणे गरजेचे आहे असे मत शेख सलीम सर यांनी व्यक्त केले.
मध्यरात्री पर्यंत विनाकारण मोकाट भटकणा-या तसेच वाड्यात , मोहल्यात गप्पा करणा-यांवर बंधन घालून त्यांचा बंदोबस्त करावा असे मत शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन यांनी व्यक्त केले.
यासह मौलाना गयासूद्दीन, नगरसेवक पद्माकर महाजन, अॅड योगेश गजरे, अशोक शिंदे, दिलिप कांबळे, शेख गयास, अय्युब पहेलवान यांनीही आपापले मौल्यवान मत व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक आसीफ मोहम्मद, पंकज वाघ, संतोष लालचंद पाटील, भा.ज.प. तालुका प्रसिद्धी प्रमुख नितीन पाटील, भा.ज.प. चे दिलिप पाटील, शेख मेहमूद, भाऊलाल शिंदे, शेख युसूफ, सलीम शेख, अस्लम शेख, राजेश पांडे, शैलेंद्र अग्रवाल, पो.पा. लक्ष्मिकांत लोहार, रफिक टेलर, सैय्यद आरिफ, श्रीराम महाजन आदी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी पोलीस काँस्टेबल निलेश लोहार यांचा सर्व शांतता समिती सदस्य यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.