जळगाव जिल्ह्यात हरभरा, ज्वारी, मका गहू बियाण्याचे अनुदानावर वितरण...

अनामित
जळगाव -  जिल्ह्यात यंदा समाधान कारक पर्जन्यमान झालेले आहे. यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू पिकाखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके व बियाणे लागवड उप अभियानांतर्गत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम या दोन योजनेंतर्गत हरभरा, ज्वारी, मका, गहू बियाणे अनुदान तत्वावर वाटप होणार आहे.
[ads id="ads2"]
  रब्बी हंगामात हरभरा पिकाचे प्रमाणित बियाणे वितरण या बाबीचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामात हरभरा पिकाचे 10 वर्षाआतील पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रांत, फुले विक्रम, आरव्हीजी-202 व बीडीएनजीके-798 या वाणांचे एकूण 6291 प्रमाणित बियाणे रक्कम रुपये 2500 प्रति क्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. 
[ads id="ads1"] प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे. भरडधान्य योजनेंतर्गत 354 मका पिकासाठी 750/- रुपये प्रती किलो अनुदान तसेच रब्बी ज्वारी साठी रुपये 30 प्रती किलो 10 वर्षे आतील वाणासाठी 460 क्विंटल व 110 क्विंटल, 10 वर्षे वरील वाणासाठी 15 रुपये प्रती किलो अनुदान तत्वावर बियाणे वितरण होणार आहे.
  तसेच सन 2021-22 बियाणे व लागवड उप अभियानाअंतर्गत ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत 10 वर्षावरील जॉकी -9218 या वाणाचे एकूण 1200 क्विंटल प्रमाणित बियाणे रक्कम रुपये 2500/- प्रति क्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन आहे. 5373 क्विंटल इतका गहू रुपये 1600/- प्रति क्विंटल अनुदानाने वितरीत केला जाईल. या योजनेत प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत लाभ देय आहे.
  सदर अनुदान तत्वावर बियाणेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेण्यात यावा. अधिक माहितीसाठी जवळच्या उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, जळगाव व महाबीज यांचे अधिकृत वितरक यांच्याशी देखील संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!