महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर येथे डोळ्यांचे शिबिर संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर प्रतिनिधी (राजेन्द्र अटकाळे) रावेर येथे आज दि. २८ नोव्हेंबर रविवार रोजी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या स्मृती दिना निमत्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप व धुप पुजा करुन सर्वानी अभिवादन केले. यावेळी कांताई नेत्रालयाच्या वतीने ७५ रुग्णाची तपासणी करुण १८ रुग्णाना मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.  [ads id="ads2"]  

     याप्रसंगी कामगार नेते दिलीप कांबळे बोलत असताना महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार आजही संपूर्ण भारताला नितांत गरज आहे त्यांनी मांडलेल्या शेती विषयक विचार आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतः सावित्रीबाई फुले यांना शिकवून प्रथम शिक्षिका बनविले नंतर स्त्रियांसाठी  पहिली शाळा काढली यामुळे भारत देशामध्ये एक मोठी क्रांती निर्माण झाली आज स्त्रीया अतिशय उच्च शिक्षण घेऊन भारतातच नव्हे परदेशात सुद्धा भारतीय स्त्री आपल्या शिक्षणाच्या जोरावर काम करत आहे .[ads id="ads1"]  

      कांताई नेत्रालयचे   कॅम्प मॅनेजर युवराज देसर्डा यांनी शिबिरार्थी यांना मार्गदर्शन करुन माहिती दिली.

 कांताई नेत्रालय यांचे तर्फे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात चिकित्सक डॉ. अभिषेक पयाशी , डॉ. रोहीत अग्नीहोत्री,व कांताई नेत्रालयाचे शिबिराचे कॅम्प मॅनेजर युवराज देसर्डा यांनी ७५ शिबिरार्थीची तपासणी करुन त्या पैकी १८  रुग्ण मोतीबींदूच्या शस्त्रक्रियेसाठी आज जळगांव येथे कांताई नेत्रालेय हॉस्पीटलला घेऊन गेले आहे.

      कांताई नेत्रालयाचे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे  कामगार नेते दिलीप कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संघरक्षक तायडे, पुंडलिक कोंघे, माजी पं.स. सदस्य कैलास पारधी, भाजपा मागासवर्गीय जिल्हा उपाध्यक्ष दिलीप लहासे, (खान्देश माळी महसंघाचे ) तालुका अध्यक्ष मुरलीधर उर्फे पिंटु महाजन,फुले,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अटकाळे,  जयेश पाटील, शेख इम्रान मेंबर ,आबा पवार  आदि  प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

       पुढे बोलतांना कांबळे असे म्हणाले की,  महात्मा ज्योतिबा फुले यांना यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करताना संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय त्यांच्या पुरोगामी विचारसरणीवर चालत असून आजही त्यांच्या विचारांची शासन दखल घेत आहे जर त्यांचे विचार शासन आणि प्रशासनाने पूर्ण केले असते आज शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या म्हणून भविष्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून शेती विषयक धोरण महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या काळात लिहिले होते त्या आधारावर आपण वाटचाल करणे गरजेचे आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!