पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले आणि सध्या ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पाक्षिक "प्रबुद्ध भारत"च्या नवीन वर्षाच्या (२०२२) दिनदर्शिकेचे उद्घाटन ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले. 1 डिसेंबरपासून प्रबुद्ध भारत दिनदर्शिका बाजारात उपलब्ध होणार आहे.[ads id="ads2"]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक प्रबुद्ध भारतमधून बहुजन, कष्टकरी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली जाते. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घटना, घडामोडींचे विश्लेषण आणि बातम्यांसाठी प्रत्येकाने प्रबुद्ध भारत पाक्षिकाचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहन करून ऍड. आंबेडकर यांनी शुभेच्छा दिल्या.[ads id="ads1"]
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि प्रबुद्ध भारतचे संपादक ऍड. प्रकाश आंबेडकर, प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी नुकताच हा कार्यक्रम झाला.
यावेळी प्रबुद्ध भारतचे वृत्तसंपादक जितरत्न पटाईत, पत्रकार वैभव खेडकर, सुशील म्हसदे, विलास टेकाळे, ऍड. गायत्री कांबळे, संजीवन कांबळे, संतोष जोगदंड, अनिल भारती आदी उपस्थित होते.
प्रबुद्ध भारत दिनदर्शिकेसाठी संपर्क -
कार्यालय - 020 - 24475889
जितरत्न - 7385550633
वैभव - 8421969717