रावेर प्रतिनिधी (सिद्धार्थ तायडे) आज दि.१८/११/२०२१ रोजी निळे निशाण सामाजिक संघटना चे मुख्य कार्यालय रावेर येथे संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या मार्गदर्शना खाली तसेच नियोजन समिती प्रमुख महेशजी तायडे व नियोजन समिती उपप्रमुख सदशिवजी निकम यांच्या उपस्थितित निळे निशाण सामाजिक संघटना प्रणित मोटार - वाहन चालक मालक मंच रावेर तालुका अध्यक्ष पदी शरद तायडे यांची निवड करण्यात आली.[ads id="ads2"]
त्या प्रसंगी संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत गाढे , उपाध्यक्ष सुधिर सेंगमिरे , नारायण सवर्णे , शरद बगाडे , संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष विजय धनगर , कार्यालयीन सचिव बाळु निकम , निभोरासिम शाखा अध्यक्ष छगन सवर्णे , दादाराव सवर्णे यांनी शरद तायडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.