[ads id="ads2"]
भुसावळ हातमाग विणकर कोष्टी समाज सेवा मंडळाच्या वतीने लिंगायत कोष्टी समाजाचा व्दितीय वधू-वर परिचय मेळावा १३ नोव्हेंबर रोजी लोणारी समाज मंगल कार्यालय, भुसावळ येथे होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी नानासाहेब घोडके, मेळाव्याचे उद्घाटक म्हणून मा. आमदार श्री. संजय सावकारे, तसेच
[ads id="ads1"]
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते सोयरीक परिचय पुस्तिकेचे प्रकाशन होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे, बोधराज चौधरी, अमोल इंगळे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पुष्पा म्हसकर, अंजली बन्नापुरे, संजय लवणे, नारायणराव वड्डे, अशोक वाळवेकर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी दिपक विनंते, राजेश कोष्टी, मुकेश कोष्टी, दिपक कोष्टी, विनय कोष्टी, सतिष घोडके आदी अथक परिश्रम घेत आहे. या मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष माधव गरूडे यांनी केले आहे.