रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) रावेर शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मूलाला ट्रेनचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि. १३ नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी घडली आहे. घटनेची माहीती मिळताच रावेर शहरासह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
[ads id="ads2"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रावेर शहरातील शिवाजी चौक येथील रहिवासी लोकेश संजय महाजन (वय १६ ) हा सकाळ पासुन घरातून निघुन गेला होता.
[ads id="ads1"]
त्यांच्या कुटुंबियांनी त्याचा शोधा शोध केला असता त्याचा मृतदेह रावेर रेल्वे स्टेशन नजिक सापडला. कोणत्या तरी ट्रेनच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत रावेर पोलिस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
