रावेर प्रतिनिधी : तालुक्यातील विटवे येथे संविधान जागर समिती विटवे शाखे तर्फे 26 नोव्हेबर संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विटवे गावातील लोकनियुक्त सरपंच भास्करराव चौधरी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन संविधान पूजन, व संविधान प्रास्ताविका सामूहिक रित्या वाचन करण्यात आले.[ads id="ads2"]
यावेळी संविधान जागर समिती रावेर तालुका प्रमुख साहेबराव वानखेड़े, उपसरपंच चेतन पाटील, ग्रा. पं. सदस्य गणेश मनुरे, ग्रा. पं.सदस्य सुरेश कोळी, पोलिस पाटील बाळु पवार, नरेंद्र वानखेड़े मुकेश चौधरी,ग्रा. पं. सदस्य दिपक मनुरे ब्रिजलाल अढागळे, वना कोळी, समाधान भालेराव, गोपाल वानखेड़े, व गावातील सर्व समाजातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा ☞ कन्नड घाटातील वसुली प्रकरणी चार पोलीस कर्मचारी निलंबीत