जळगांव : आपल्या आगळ्यावेगळ्या आंदोलनांनी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रतील तरुणाईच्या गळ्यातील ताईत.शेतकरी,मजूर,दिव्यांग, विधवा व गोरगरीब जनतेचे कैवारी तसेच भ्रष्ट व कामचुकार अधिकाऱ्यांचे कर्दनकाळ राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन [ads id="ads2"] तसेच पक्षाचे उ.म.अध्यक्ष, जळगांव जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशाने आज लोहारा येथील काँग्रेस व भाजप च्या कट्टर समर्थक असलेल्या शेकडो तरुणांनी प्रहार युवा जिल्हा प्रमुख अविनाश पाटील,रावेर ता.प्रमुख पिंटू धांडे,रावेर ता.युवा प्रमुख योगेश निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि लोहारा येथील मज्जिद तडवी व सुनील पवार यांच्या पुढाकाराने प्रहार मध्ये जाहीर प्रवेश केला.[ads id="ads1"]
सर्वप्रथम ता.युवा प्रमुख योगेश निकम यांनी बच्चू भाऊंचा जीवनप्रवास सांगितला तर युवा जिल्हा प्रमुख अविनाश पाटील यांनी पक्षाचे ध्येय,धोरण व काम करण्याची पध्दत याबद्दल सांगितले.
या प्रसंगी प्रहार चे आमद तडवी,राजू पाटील आणि तय्यूब तडवी उपस्थित होते.