जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सुविधा मुबलक ठेवा - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

अनामित
जळगाव : कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी आणि लसीकरणाचे नियोजन योग्य रितीने करावे, आरोग्य सुविधा मुबलक असाव्यात यादृष्टीने आरोग्य यंत्रणेने कार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज दिल्या. 
 [ads id="ads2"]
  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत श्री.राऊत बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, पोलीस उप अधीक्षक कुमार चिंथा आदी उपस्थित होते. 
  महाविद्यालये, वस्तीगृहे, पेट्रोल पंप, रेल्वेस्टेशन, बस स्थानके, फुले मार्केट या ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्यात यावीत. या ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात यावी. 
[ads id="ads1"]
 मोहाडी रुग्णालयात 100 ऑक्सिजन प्लांट आवश्यक आहे. प्रत्येक रुग्णालयात आयसीयूचे नियोजन करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या. फुले मार्केटमध्ये व्यापारी, नागरिकांनी लस घेतली आहे किंवा नाही त्यासाठी सुद्धा नियोजन करण्यात यावे. ‘कोविशिल्ड’ व्हॅक्सीन लशी जिल्ह्यात सर्वापर्यंत पोहोतील या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीमध्ये दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!