Raver तालुक्यातील वाघोड या गावी अवैध दारू प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे त्यामुळे तणाव निर्माण होत आहे .त्यासाठी काल दि. २० नोव्हेंबर शनिवार रोजी वाघोड गावकरी यांनी Raver पोलीस स्टेशन पोलिस निरिक्षक कैलास नागरे महिला दक्षता कमिटीच्या कांताबाई बोरा मॅडम भाग्यश्री पाठक .कर्जोद ,विजय सिताराम महाजन वाघोड येथील सरपंच संजय मशाने यांनी गावकरी यांची एक नियोजन बैठक घेत पो.नि. कैलास नांगरे यांना आपल्या गावातील .परिस्थिती निवेदनाद्वारे तसेच एक बैठकीत घेऊन सांगितलं [ads id="ads2"]
ती अशी सविस्तर वृत्त असे वाघोड गावात मागील ७ ते ८ वर्षापूर्वी गावकरी यांनी .महिला विशेष ग्रामसभा आयोजित करून वाघोड गावा मध्ये असलेले देशी दारु किरकोळ विक्रीचे दुकान राज्य उत्पादन शुल्क यांना वेळोवेळी निवेदन देत तक्रार देऊन होणारा त्रास निर्दशनास आणत व नंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतलेल्या मतदानात कायमची दारू बाटली आडवी केली याचा राज्य शासनाच्या नियमानुसार एखाद्या गावाने विनंती अर्ज केल्यास मतदान करून गावामध्ये दारूबंदी होऊ शकते.[ads id="ads1"]
त्यानुसार वाघोड गावामध्ये दारूबंदी झाली त्यानंतर काही दिवस दारु बंन्दी राहील्या नंतर वाघोड गावां मध्येच काही लोकांनी सर्रासपणे अवैध दारु ही गावातच क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळा जवळच, स्टँड जवळ विविध भागात भरदिवसा व .भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर या परिसरात देखील तसेच आजूबाजूला काही अवैध दारू बिनधास्तपणे विक्री सुरू झाल्याने गावामध्ये बऱ्याच वेळा अवैध दारू विक्री करणाऱ्यांना गावकरी यांनी समज देण्यात आला परंतु उपयोग न होता दमबाजी होऊ लागली त्यामुळे गावकरी यांच्यामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले याचा परीणाम होवुन तेव्हा काही वर्षा आधी रात्रीच्या वेळेस दारू विक्री करणाऱ्या टपऱ्या त्यांच्या घराजवळ गावकऱ्यांनी उद्रेक केला त्यामध्ये अवैधदारु विक्री करणारे व गावकरी व पुरुष व महिला यांच्यात बाचाबाची झाल्या त्यात अवैध दारुसाठी वापरण्यात येणाऱ्या टपर्या जाळण्यात आल्या प्रकरण पोलीस स्टेशन मध्ये प्रकरण आले परंतु त्यांना राजकीय व दारु परवानाधारकाच्या आशीर्वाद मिळाल्याने त्यांनीच गावकरी महीला पुरुष यांच्यावरच कारवाई करण्यात केली.
त्यामुळे त्यांना दारू विक्रीमध्ये वचक न बसता एकप्रकारे अवैध दारू विक्री ही बिनधास्तपणे .होऊ लागली यासाठी दारु बंन्दी लढा देणारे यांना त्रास देण्यात आला तरुण मुले व्यसनधिनता अजुन वाढ झाल्याचे निर्देश नास येत आहे दारु बंन्दी साठी प्रयत्न केले त्यांच्यावर खोटे केसेस आरोप करण्यात आले त्यामुळे त्यांनी बाजुला व्हाव लागले यात अवैध विक्री करणारे यांचा एक प्रकारे विजय झाला व नंतर काही दिवसातच सर्रास दारूविक्री सुरू झाली आहे ती दारू विक्री यात परिसरातील परवानाधारक दारू दुकानदार यांचे आशीर्वाद , पोलीस प्रशासनाचे काही कर्मचारी तसेच राजकीय वरद हस्त दिसत असल्यामुळे त्यांनी बिंदास अवैध दारू विक्री चालू केली आहे. त्यामुळे तरुण व्यसनाधिन होत आहे सर्रास अवैध दारू विक्री करणाऱ्याची नावे निवेदनात दिली आहे ती पुढील प्रमाणे १)कौतिक बळीराम महाजन, २ ) गजानन प्रकाश तायडे ३ ) देवानंद रमेश मशाने ४) जगदीश यशवंत पाटील ५ ) अरुण पितांबर मशाने ६ )रघुनाथ राजाराम मशाने ७ )ज्ञानेश्वर भगवान मशाने ८ )राजेंद्र तायडे ( गेंडा बुवा )तसेच शिवशंभो हॉटेल कर्जाद फाटा ढाबा इथे सर्रास आज दारू विक्री होते व ते कोणालाही घाबरत नाही यात गावकरी यांना दमबाजी दिली जाते यामुळे ग्राम बैठक घेत रावेर पीआय कैलास नागरे यांना वाघोड येथील ग्रामस्थांनी आपली व्यथा मांडली अवैध दारु विक्री करणाऱ्या वर योग्य कारवाई व्हावी अशी मागणी गावागावातून होत आहे तसेच मागील प्रकार परत घडू नये यासाठी साहेबांनी लक्ष देणे गरजेचे होय दिलेल्या नावावर भर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

