रावेर तालुक्यातील तामसवाडी येथे मतदार यादी वाचन करणे कामी विशेष ग्रामसभा संपन्न

अनामित
रावेर प्रतिनिधी (राजेश रायमळे) आज दि. १६/११/२०२१ वार मंगळवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय तामसवाडी येथे मतदार यादीचे वाचन करणेबाबत विशेष ग्रामसभा संपन्न झाली याबाबत सविस्तर वृत्त असे की,आज दि.१६/११/२०२१ मंगळवार रोजी सकाळी ठीक ११:०० वा.तामसवाडी ता.रावेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात रावेर विधानभा क्षेत्र ०११ मधील तामसवाडी व बोरखेडा यादी भाग क्रमांक १२१ व १२२ मतदार यादी वाचन करणे बाबत तसेच मतदार यादीतील नवीन नोंदणी करणे,
[ads id=ads2"] नोंदणी मधील दुरूस्ती,नाव कमी करणे ई.प्रक्रिया ग्रामस्थांपर्यंत सुलभतेने पोहोचवता याव्यात याकरिता विशेष ग्रामसभा आयोजीत केलेली होती.मात्र ग्रामस्थांकडून योग्य तो प्रतिसाद पहायला मिळाला नाही, तेव्हा ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी, व बी.एल.ओ.यांचे उपस्थितीतच यादी वाचन अटोपले.
[ads id=ads1"]
 तामसवाडी व बोरखेडा बी.एल.ओ. भुषण शिवाजी गवारे आणि संदिप प्रकाश निकम यांनी यादी वाचून दाखवत नवीन नोंदणी व दुरूस्ती विषयक माहीती दिली. यावेळी ग्रामसेवक यांनी गांवचे पोलीस पाटील सुलक्षणा राजेश रायमळे आणि सरपंच दीपाली नरेंद्र कोळी यांचे प्रमुख उपस्थितीत गावातील विधवा,दिव्यांग, तसेच संजय गांधी निराधार व श्रावण बाळ वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांची अद्ययावत माहीती वाचून दाखवली.व सदर माहीती पत्रकांवर पदाधिकार्यांच्य स्वाक्षऱ्या घेऊन सभा संपली.
     
यावेळेस गांवचे पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारीवर्ग तसेच तामसवाडी बोरखेडा गावातील बी.एल.ओ.आणि Digital- सुवर्ण दिप न्यूज नेटवर्क रावेर तालुका प्रतिनिधि राजेश वसंत रायमळे उपस्थित होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!