राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपास मुक्ताईनगर येथे खा.रक्षाताई खडसेंचा जाहीर पाठींबा.

अनामित
[ads id="ads2"]
मुक्ताईनगर -  राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरावर सुरु असलेल्या बेमुदत संपास तसेच आंदोलन स्थळी खा, रक्षाताई खडसेंनी मुक्ताईनगर आगार येथे भेट देऊन राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांशी संवाद साधून चर्चा केली व त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. 
[ads id="ads1"]
यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या तुटपुंज्या व अनियमित वेतनामुळे राज्यात आतापर्यंत ३५ रा. प. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे, त्यात कोरोना नंतर आत्महत्यांमध्ये बरीच वाढ झालेली असून, त्यासाठी सुरु असलेल्या बेमुदत उपोषणास दरम्यान मुक्ताईनगर आगारातील रा. प. कर्मचाऱ्यांनी माझ्या समोर राज्य शासनाकडे असलेल्या विविध मागण्याचा पाढा वाचला त्यात राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलीनीकरण करणे ह्या प्रमुख मागणीचा समावेश आहे. 

परंतु महाराष्ट्र राज्य सरकारने सदर संप हा बेकायदेशीर असून तत्काळ कामावर हजर होण्याचे सांगून, राज्यातील ४५ आगारातील एकूण ३७६ रा.प. कर्मचाऱ्यांना निलंबित करून, त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, ही बाब रा.प. कर्मचाऱ्यांचा अन्याय व अपमान करणारी आहे.

यावेळी राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या सर्व मागणी जाणून घेऊन, राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडे आपल्या परीने ठोस पाठपुरावा करणार आहे असे आश्वासन देत राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपास मुक्ताईनगर येथे खा, राक्षाताई खडसेंनी जाहीर पाठींबा दिला.

यावेळी खा, राक्षाताई खडसे, भाजपा मुक्ताईनगर तालुका सरचिटणीस श्री.चंद्रकांत भोलाणे, श्री.प्रशांत महाजन यांच्यासह रा.प. महामंडळ कर्मचारी प्रमोद धायडे, प्रभाकर मोरे, रवींद्र सावळे, बॉबी सुरवाडे, शांताराम नागरुत, शशिधर कथोरे, प्रमोद गोसावी, अनिल सपकाळे, सुरेश नायसे, कैलास वंजारी, राहुल पाटील, धोंडू सुरवाडे, नरेंद्र देशमुख, राहुल केशव पाटील ई. प्रमुख उपस्थितीत होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!