रावेर प्रतिनिधी (राजेश रायमळे) तामसवाडी ता.रावेर येथे लसीकरण जनजागृती मोहीम जोमात जारी असून कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत प्रबोधन आणि जनजागृती करित आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असेकी कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट Omicron च्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावरून नवीन नियमावली जाहीर झालेली असून
[ads id="ads2"]
लसीकरण अनिवार्य असलेची शासनाची नियमावली बाबत तसेच कोव्हीड अनुरूप वर्तन बाबत आवाहन व त्यासाठी प्रबोधन करण्यासाठी तामसवाडी ता.रावेर येथील कर्मचारी सज्ज झालेले असून सदर कर्मचारी घरोघर जाऊन लसीकरणाबाबत प्रबोधन आणि जनजागृती करत आहेत
[ads id="ads1"]
लसीकरणाबाबत जनजागृती करत असतांना छायाचित्रात जि.प.मराठी मुलांची शाळा तामसवाडीचे मुख्याध्यापक मंगेश माने, आंगणवाडी सेविका शोभाबाई बाजीराव नेमाडे, आशावर्कर सुरेखा बाळकृष्ण नेमाडे, ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी समाधान बळीराम रायमळे आणि गावचे पोलीस पाटील सुलक्षणा सुवर्णदिप न्यूज चे रावेर तालुका प्रतिनिधि राजेश वसंत रायमळे यांनी नोंदवीला सहभाग