रावेर प्रतिनिंधी राजेंद्र अटकाळे
सावदा येथे दि. २६ नोव्हेंबर शुक्रवार रोजी संविधान दिना निमित्ताने "रिस्पेक्ट युथ फाउंडेशन" च्या वतीने परिसरातील विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व कळावे, भारतीय नागरिक म्हणून आपला सर्वोच्च ग्रंथ भारतीय संविधान याबद्दल माहिती असावी, [ads id="ads2"]
संविधानाने दिलेल्या हक्क आणि अधिकार यासोबतच कर्तव्याची जाणीव राहावी या उद्देशाने "समतापथिक_प्रज्ञा_परीक्षा_2021" मध्ये विजयी उमेदवार यांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विचार मंचावर सावदा पोलिस स्टेशनचे API- डी. डी. इंगोले साहेब, PSI- पवार साहेब, [ads id="ads1"]
उपसरपंच-निंभोरासिम तथा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग कार्याध्यक्ष जळगाव राजू सवर्णे , सेवानिवृत्त केंद्रप्रमुख-सुरेश तायडे सर, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष तथा सरपंच-प्रमोदभाऊ चौधरी, आयु-उमेश गाढे, सम्राट फाउंडेशनचे अध्यक्ष-अनोमदर्शी तायडे सर, adv-राजकुमार लोखंडे, adv-सचिन तायडे, adv-आनंद वाघोदे, सावदा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका-सुभद्रा बडगे ताई, सामाजिक कार्यकर्ते-प्रकाश जयकर यांसह रिस्पेक्ट युथ फाऊंडेशन चे सर्व सन्माननीय सदस्य तसेच परिसरातील शेकडो परीक्षार्थी विद्यार्थी हजर होते.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांकडून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर संविधान दिना निमित्ताने मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. अध्यक्षीय भाषणात सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगोले साहेब यांनी संविधान, संविधानाची पार्श्वभूमी, संविधानाने बहाल केलेल्या नागरिकांच्या हक्क आणि अधिकारांची माहिती, सोबतच कर्तव्याची जाणीव यासंदर्भात माहिती आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्या पद्धतीने तयारी करावी आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना शक्य होईल त्या पद्धतीने मदत करणे यासंदर्भात माहिती दिली.
तसेच परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आला. ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज बोदडे-उपशिक्षक केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिस्पेक्ट युथ फाऊंडेशनचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

