रावेर येथे शहिद जवान लेफ्टनंट ऋषी रंजन सिंग यांच्या शोकसभेत नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली

अनामित
[ads id="ads2"]
रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) शहरात प्रणित महाजन मित्रपरिवराच्या वतीने २३ वर्षीय शहिद जवान ऋषी रंजन सिंग हे आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी पाकिस्तान सिमेवर गस्त घालत असतांना शहिद होऊन त्यांना हौतात्म्य प्राप्त झालं. 
[ads id="ads1"]
अशा या वीर जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काल रात्री दि.३ नोव्हेंबर बुधवार रोजी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऋषी रंजन सिंग यांच्या प्रतिमेला छोटू पाटील, दिलीप वैद्य, डॉ. दिपक सोळंकी, प्रणित महाजन, भैय्या पाटील, पंकज आमोदे यांनी प्रथमतः उपस्थित नागरिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून शोकसभेत आपले श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. 

यावेळी शिवाजी महाजन, गणेश महाजन, सुभाष सैतवाल, ऍड. बी.डी. निळे, राजेंद्र महाजन, बाळू पाटील, रवि बखाल, व्ही. व्ही. पाटील, विश्वनाथ पाटील, प्रमोद पाटील, गजमल पाटील, एकनाथ पाटील, दिलीप सावळे, देवेन शाह, आबा चौधरी, नितीन नेमाडे, पाटणकर अप्पा, बी.एल. सरोदे, आर.एस. पाटील, विजय पवार, नरसिंग राठोड, महेंद्र राठोड, नितीन राणे, निलेश वाणी, मुकेश बारुदवाले, आदी सर्वच स्तरातील स्त्री- पुरुष नागरिक व प्रणित महाजन मित्रपरिवार मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन माळी यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!