पशूंचे लसीकरण करा यावल तालुका राष्ट्रवादी युवक काँगेसची मागणी

अनामित
यावल वार्ताहर (सुरेश पाटील) यावल तालुक्यात संपूर्ण पशुधनाचे लसीकरण तात्काळ करण्यात यावे अशी मागणी यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन करण्यात आली.
   [ads id="ads2"]
     पंचायत समिती यावल गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल तालुक्यात संपूर्ण पशुधनावर लाळ्या खूजगट, लम्पि स्क्रीन डिसीज या संसर्जन्य आजारांच्या प्रादुर्भावा पासून पशुधनाचे संरक्षण व्हावे म्हणून पशुसंवर्धन विभागामार्फत पशुचे मोफत लसीकरण करावे.यावल तालुक्यातील ग्रामीण भागात शेती सह पशूपालन हा प्रमुख व्यवसाय आहे.बदलत्या हवामानामुळे गाय,म्हशी,बैल,शेळी,मेंढी या सारख्या जनावरांमध्ये तोंडखुरी, पायखुरी,लाळ्या खूजगट,लम्पि स्किन डिसीज या सारखे साथीचे संसर्ग आजार जनावरांमध्ये आढळून येत आहेत.
[ads id="ads1"]
या संसर्ग आजारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या साथीच्या रोगामुळे शेतकरी व पशुपालकामध्ये चिंता जनक व घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
  तरी आपल्या विभागातील कर्मचाऱ्याची व पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या कमी असल्याने याचे योग्य नियोजन करून संपूर्ण यावल तालुक्यातील पशुसंवर्धन संरक्षण उपाय योजना कराव्यात कारण आधीच यावल तालुक्यातील शेतकरी,पशुपालक कोरोना, नापिकी, दुष्काळी, शेती मालास भाव नसल्याने मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत म्हणून पशुधन वाचवणे व खूप आवश्यक आहे 

म्हणून पशुधनाचे संवर्धन व संरक्षण करून लवकरात लवकर लसीकरण कार्य मोहीम तालुक्यातील प्रत्येक गावागावात राबवावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस यावलच्या वतीने करण्यात आली आहे.निवेदनाची प्रत महितीस्तव जि.प.आरोग्य सभापती,जिल्ह्य पशुसंवर्धन अधिकारी जळगांव,कार्यकारी मुख्याधिकारी जि.प.जळगांव, 
जिल्ह्याधिकारी जळगांव. यांना देण्यात आल्या आहेत. निवेदन देतांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ऍड देवकांत पाटील,शहर अध्यक्ष हितेश गजरे,समन्वयक किशोर माळी,कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, जिल्ह्या युवक सरचिटणीस विनोद पाटील,तालुका उपाध्यक्ष पवन पाटील,शाखा अध्यक्ष गिरीष पाटील आदींची उपस्थिती होती.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!