बुलढाणा प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन अंगीकृत महिला आर्थिक विकास महामण्डल (माविम) बुलडाणा जिल्हा कार्यालय जिल्हा समन्वय अधिकारी सुमेधजी तायड़े यांचे मार्गदर्शनाखाली अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र, सुल्तानपुर केंद्र कार्यालयाच्या वतीने दिनांक 26 नोव्हेम्बर 2021 रोजी केंद्र कार्यालय सुल्तानपुर, बोरखेड़ी, वेणी, चोरपांगरा, ब्रा चिकना, अंजनी खुर्द ई विविध ठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात आला.[ads id="ads2"]
अस्मिता केंद्र कार्यालय सुल्तानपुर येथे कार्यकारणी पदाधिकारी , गावातील बचत गट महिला व केंद्र कर्मचारी यांचे वतीने भारतीय संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात येऊन संविधान प्रस्ताविका सामूहिक वाचन करण्यात आले.[ads id="ads1"]
बोरखेड़ी येथे डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांचे पुतल्यास उपस्थितानी पुष्पहार अर्पण करुन संविधान प्रस्ताविका वाचन करण्यात आले .
वेणी येथे सांयकाली आयोजित सदर संविधान अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अस्मिता केन्द्राच्या अध्यक्षा शोभाताई जाधव होत्या, उपस्थित सर्व मान्यवर व महिला बचत गटाच्या महिलानी संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांच्या पुतल्यास पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले, याप्रसंगी अस्मिता केन्द्राचे व्यवस्थापक गजेंद्र गवई यांनी भारतीय संविधान, निर्मिति, अधिकार व कर्तव्य तसेच संविधानिक मुलये याची माहिती दिली.उपस्थित सर्व गावकरी , बचत गटाच्या महिला यांनी संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन केले.
याप्रमाणे इतरही गावात संविधान दिन साजरा करण्यात आला .
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केन्द्राचे गावप्रतिनिधि, ग्रामसंघ, महिला बचत गट महिला , केंद्र व्यवस्थापक गजेंद्र गवई, सहयोगिनी रीना सरकटे, वर्षा पवार, रेखा गवई , मयूरी गवई, यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीना सरकटे यांनी केले तर आभार वर्षा पवार यांनी मानले.
कार्यक्रमास प्रत्येक गावात ग्रा प, सदस्य, पदाधिकारी, ग्रामसंघ पदाधिकारी, बचत गट महिला सह गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते .