रावेर पोलिसाकडून बेदम मारहाण एकाचा पाय फॅक्चर ; मारहाणीच्या निषेधार्थ निवेदने सादर, मानवाधिकार आयोगासमोर मोठे आव्हान

अनामित
[ads id="ads2"]
पोलीस अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीस अश्लील शिवीगाळ करून बेदम मारहाण हा आतंकवादी आहे असे म्हणून त्याला आडवे पाडून त्याच्या अंगावर क़ुदुन कदुन जबर मारहाण करण्यात आली 

रावेर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अनाधिकृत गैरकायदेशीर तसेच दोन नंबरचे धंदे शंभर टक्के बंद आहेत का? 

दोन नंबर वाल्यांना सुद्धा रावेर पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवून त्यांना जबर मारहाण करून त्यांना नियंत्रणात ठेवले आहे का?

घटना काही असो घटनेतील संबंधित व्यक्ती दोषी जरी असली तरी पोलिसांनी जी मारहाण केली ती मारहाण कोणत्या नियमानुसार केली

दादागीरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा पोलीस कर्मचाऱ्यांना गडचिरोली जिल्ह्यात किंवा ज्या ठिकाणी आतंकवादी जास्त प्रमाणात आहेत त्या ठिकाणी पाठवायला पाहिजे असे सुद्धा रावेर तालुक्यात बोलले जात आहे.

तरी जिल्हा पोलीस अधीक्षक काय कार्यवाही करतात? याकडे रावेर तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष वेधून

निवेदनाच्या/ तक्रारच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,गृह मंत्री, विशेष पोलीस महासंचालक, पोलीस महासंचालक यांच्यासह स्थानिक व संबंधित लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आल्या

यावल / रावेर प्रतिनिधी (सुरेश पाटील) तालुक्यात दिवाळीच्या दिवशी नरकासुर राक्षसी प्रवृत्ती अवतारल्याची घटना घडल्याची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने रावेर पोलिसांबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून पोलीससांनी बेदम मारहाण कोणत्या नियमानुसार व का केली तसेच गुन्हेगारी क्षेत्रात गुंडगिरी आहे की पोलीस दलात हे आता मानवाधिकार आयोगाला मोठे आव्हान निर्माण झाले 
[ads id="ads1"]
असून देशातील राजकीय हालचाली लक्षात घेता रावेर विधानसभा व लोकसभा मतदार संघातील अनुक्रमे राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील काँग्रेसचे आमदार शिरिषदादा चौधरी आणि भाजपाच्या खासदार रक्षाताई खडसे हे आपल्या मतदार संघातील मतदारास बेकायदेशीरपणे झालेल्या शिवीगाळ व बेदम मारहाण बाबत तात्काळ ठोस निर्णय काय घेतात?याकडे आता संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष वेधुन आहे.

    व्हायरल झालेली व्हिडीओ क्लिप प्रत्यक्ष बघितली असता त्या क्लिपमधे फिर्यादी व संबंधित व्यक्ती व्यक्तीमध्ये भांडण झाल्याच्या कारणावरून रावेर पोलीस स्टेशनला गेले होते.या घटनेतील फिर्यादी स्वत: म्हणत होता की हा व्यक्ती भांडणाच्या ठिकाणी नव्हता तरी सुद्धा संबंधित पोलिस अधिकारी म्हणतो नाही तो भांडणाच्या ठिकाणी होताच असे म्हणत पोलीस अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीस अश्लील शिवीगाळ करून बेदम मारहाण करून तसेच हा आतंकवादी आहे असे म्हणून त्याला आडवे पाडून त्याच्या अंगावर क़ुदुन कदुन जबर मारहाण करण्यात आली यात एकाचा पाय मोडला गेला/पाय फॅक्चर झाला असे व्हिडिओ क्लिप मधील संभाषणावरून दिसून येत आहे.रावेर पोलिस अधिकाऱ्यांकडून झालेल्या मारहाणीमुळे रावेर पोलीस स्टेशनला मोठा दांगडो झाला.

         भांडणाच्या घटनेत मारहाण केली किंवा संबंधित व्यक्तींची चूक असली तरी पोलिसांना बेदम मारहाण करण्याचा कायदेशीर हक्क कोणी दिला आहे का?हा मोठा कायदेशीर प्रश्न उपस्थित होत असून पोलिस स्टेशनला आलेल्या नागरिकाला,फिर्यादीला, किंवा संशयित आरोपीला बेदम मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना आहे का?रावेर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अनाधिकृत गैरकायदेशीर तसेच दोन नंबरचे धंदे शंभर टक्के बंद आहेत का? आणि या दोन नंबर वाल्यांना सुद्धा रावेर पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवून त्यांना जबर मारहाण करून त्यांना नियंत्रणात ठेवले आहे का?अशा काही मुजोर आणि दादागीरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा पोलीस कर्मचाऱ्यांना गडचिरोली जिल्ह्यात किंवा ज्या ठिकाणी आतंकवादी जास्त प्रमाणात आहेत त्या ठिकाणी पाठवायला पाहिजे असे सुद्धा रावेर तालुक्यात बोलले जात आहे. घटना काही असो घटनेतील संबंधित व्यक्ती दोषी जरी असली तरी पोलिसांनी जी मारहाण केली ती मारहाण कोणत्या नियमानुसार केली.आणि केलेली मारहाण ही लोकशाही राज्यात घातक स्वरूपाची असल्याने तसेच शासनाला आणि संपूर्ण पोलीस खात्याला बदनाम करणारे नरकासुर प्रवृत्तीचे दर्शन घडविणारे दुष्कृत्य आणि मारहाण करणाऱ्यांविरुद्ध मानवाधिकार आयोगाकडे रीतसर तक्रार केली जाणार असल्याची माहिती भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्हा संघटक भारतीय जनसंसद जळगाव जिल्हा अध्यक्ष सुरेश जगन्नाथ पाटील यांनी दिली.

         याबाबत जळगाव जिल्हा मणियार बिरादरी अध्यक्ष फारुक शेख अब्दुल्ला एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख अहमद हुसेन, जळगाव महानगर काँग्रेस अध्यक्ष नदीम काझी, यांच्यासह अब्दुल रहमान शेख करीम यांनी स्वाक्षरी करून पोलीस अधीक्षक जळगाव यांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदन दिले त्यात म्हटले आहे की पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्यासह पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक,पोलीस उपनिरीक्षक शीतल सोनवणे,पो.कॉ.विशाल पाटील वगैरे यांनी मोहम्मद बाबर यांना बंदिस्त ठेवत डांबून ठेवून अश्लील जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण केली या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत असून यांना तात्काळ जळगाव मुख्यालयात जमा करून घटनेची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनाच्या/ तक्रारच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,गृह मंत्री, विशेष पोलीस महासंचालक, पोलीस महासंचालक यांच्यासह स्थानिक व संबंधित लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत. तरी जिल्हा पोलीस अधीक्षक काय कार्यवाही करतात? याकडे रावेर तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष वेधून आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!