रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) शहरात आज दि. ३० नोव्हेंबर मंगळवार रोजी थॅलेसिमियाची रुग्ण १३ वर्षीय अनुष्का चे वडिल व त्यांचे मित्र परिवार यांच्या सहकार्याने रावेर येथे झालेल्या रक्तदान शिबीरात २५७ रक्तदात्यांनी रक्तदान करून मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने परिसरात या उपक्रमाचा एक वेगळा आदर्श ठरला आहे,
[ads id="ads2"]
रावेर शहरातील गांधी चौकात राहणारे सामान्य कुटूंबातील ज्ञानेश्वर नारायण चौधरी यांची अनुष्का ही कन्या असून, जन्माच्या तिसऱ्या महिन्यापासून थॅलेसिमिया आजाराने ती ग्रस्त आहे.
थॅलेसिमिया हा एक अनुवांशिक आजार आहे, या रुग्णांच्या शरीरात स्वतःचे रक्त तयार होत नाही. त्यामुळे या रुग्णांना दर १५ दिवसांनी रक्ता दयावे लागते. थॅलेसिमिया पीडीत रूग्णाच्या रक्ताची गरज त्यांचे आई-वडील कधीच पूर्ण कर शकत नाही. त्यांच्यासाठी रक्तदान करणारे समाजातील रक्तदाते हे त्यांचे पालक बनुन रक्तदान करू शकतात.
रावेर तालुक्यात थॅलेसेमिया या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले जवळपास सुमारे १०ते १२ रूग्ण आहेत. यांनाही या रक्तदान शिबीराचा उपयोग व्हवा या उद्देशाने प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे गांधी चौक रावेर येथे आयोजन करण्यात येते.
यंदा झालेल्या या रक्तदान शिबिरात २५७ रक्तदात्यांनी रक्तदान करून भरभरून प्रतिसाद दिला तसेच मित्र परिवार यांनी मोठे सहकार्य केले.
गोळवलकर रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी अर्जुन राठोड व रेडक्रास रक्तापेढीचे डॉ. सोनवणे यांचे सहकार्य लाभले.