याबाबत असे की, सामराेद येथील योगेश धुंदाळे या तरूण शेतकऱ्याने दिवाळीच्या दिवशी स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील सदाशिव निना धुंदाळे यांचे वय ६० वर्ष आहे. त्यांच्याकडून शेतीची कामे होत नाहीत. त्यामुळे काही वर्षांपासून योगेश स्वत: शेती करून कुटुंबाचा गाळा चालवत होता. [ads id="ads1"]
मात्र, यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले हाेते, तर लागलेला खर्चही निघणार नाही. अशावेळी पुढील काळात घराचा रहाट-गाडा कसा चालवावा, या विवंचनेत असलेल्या योगेश धुंदाळे हे गुरुवारी सकाळी बैलगाडी घेऊन शेतात गेले. तेथेच नैराश्येतून गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. बराच वेळ होऊनही योगेश हे जेवणासाठी घरी आले नाही. त्यामुळे योगेशला बोलावण्यासाठी गेले असता त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.

