रावेर प्रतिनिधी (राजेश रायमळे) पोलीस प्रशासनाकडून त्रिपुरा हिंसाचारा संदर्भात काही ठीकाणी घडलेल्या हिंसाचाराचे अनुषंगानेसंवेदनशील भागात रूट मार्च याबाबत सविस्तर वृत्त असे की, त्रिपुरा येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र व देशभरात पुकारलेल्या १२ नोव्हेंबर चा बंद हा रावेर मध्ये शांततेत पार पडला परंतु महाराष्ट्रात काही ठिकाणी चुकीचे प्रकार घडले जे पुरोगामी महाराष्ट्राला शोभेसे नव्हते.
[ads id="ads2"]
त्याअनुषंगाने रावेर येथे आज दि. १५ नोव्हे संध्याकाळी साडेपाच ते साडे सहा च्या दरम्यान रावेर पोलीस स्टेशन ते मार्ग डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बहाणपुर जिलेबी , रुस्तम चौक बडी मरकज , सुन्नी मशिद, छोटी मरकज , शंकर प्लॉट , बंड्चौक , राजे संभाजी नगर, इमामवाडा , कोतवाल वाडा मशिद, थळा भाग ' [ads id="ads1"]राजे शिवाजी चौक , मण्यार वाडा मशीद, भोई वाडा मशीद ,गांधी चौक , चौराहा , स्टेशन रोड मार्गे समिश्र अश्या भागात पथसंचलन करण्यात आले हया वेळी पोलिस निरीक्षक कैलाश नागरे, सहपोलीस निरीक्षण शितल कुमार नाईक , उपनिरीक्षक मनोहर जाधव , उपनिरिक्षक सचीन नवले तसेच पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार RCP प्लांटून यांनी रुट मार्च करण्यात आला.