नाळीद जि.प.प्राथमिक शाळाच्या शिक्षिका सौ.अंजना नामदेव बहिरम यांना समता शिक्षक परिषदेचा जिल्ह्यास्तरीय 'गुणवंत शिक्षक' पुरस्कार जाहीर

अनामित
कळवण प्रतिनिधी (सुशिल कुवर) क्रांतीससूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनी 28 नोव्हेंबर या दिवशी मागील तीस वर्षांपासून समतेचा जागर करत महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हाभरातील आदिवासी पाडा, वाडी-वस्ती, दर्‍याखोर्‍यात ज्ञान दानाचे काम करणार्‍या शिक्षकांना ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
[ads id="ads2"] यावर्षी देखील रविवार 28 नोव्हेंबर 2021 रोजी नाशिक येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात राज्याच्या शिक्षणमंत्री नामदार वर्षा गायकवाड व ‘माणुसकीची शाळा’ या उपक्रमाचे प्रणेते शाहीर संभाजी भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
[ads id="ads1"] कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष राजेंद्र गायकवाड असणार आहे. शाहीर संभाजी भगत हे ‘माणुसकीची शाळा’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत, तर तृतियपंथीयांसाठी विशेष कार्य करणार्‍या महाराष्ट्र शासनाच्या विशेष निमंत्रीत जयश्री खरे (बागुल) यांचा विशेष पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. पक्रमाच्या जिल्हा समन्वयक अर्चना मारगोनावर यांचा विशेष सत्कार होणार आहे असे समता शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड व जिल्हा सरचिटणीस संजय कुमार पगारे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून कळवले आहे.

या कार्यक्रमाचे स्वरूप सन्मानचिन्ह, उद्बोधनपर ग्रंथ व मानपत्र असे असणार आहे.
 
हे शिक्षक होणार गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

विशेष पुरस्कार प्रा. जयश्री खरे बागुल (नाशिक), अर्चना मारगोनवार (समन्वयक नन्ही कली), जिल्हा स्तरीय पुरस्कार केदार सुखदेव निकम (मालेगाव), नलिनी बन्सीलाल अहिरे (निफाड), अमिता रत्नाकर सोनवणे (दिंडोरी), सुरेश हिरामण ठाकरे (सटाणा), सुनील मधुकर बोंडे (मनपा नाशिक), जितेंद्र मोतीराम अहिरे (इगतपुरी), सुवर्णा शामराव देवरे (देवळा), अंजना नामदेव बहिरम (कळवण), कल्पना देवराम ब्राम्हणे (मालेगाव), रमेश आधार पाटील (त्र्यंबक), सविता नारायण नेहे-उगले (सिन्नर), खान मन्सूर मेहबूब (चांदवड), देवदत्त हरी चौधरी (पेठ), गजानन निवृत्तीराव देवकते (येवला), फेरोज निजामुद्दीन शेख (सुरगाणा), छाया नामदेव माळी (मनपा नाशिक), योगेश सुरेशराव साळवे (नांदगाव), नवनाथ छबू खरे ( निफाड) यांचा "गुणवंत शिक्षक" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!