जळगाव जिल्ह्यात बंदी घातलेल्या फटाक्यांची विक्री करणे अवैध

अनामित
[ads id="ads2"]
जळगाव - मा. सर्वोच्च न्यायालयातील न्यायालयीन प्रकरण I.A No.44727/2021 in Writ Petition (C) No. 728/2015 मध्ये न्यायालयाने दि. 29 ऑक्टोबर, 2021 रोजी बंदी घातलेल्या फटाक्याचे उत्पादन, विक्री किंवा वापर तसेच विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले
[ads id="ads1"]
फटाके जवळ बाळगणे, त्यांचा साठा करणे आणि त्यांची विक्री करणे कायद्यानुसार अवैध आणि दंडनिय असल्याचे निर्देश दिलेले आहेत. मा. न्यायालयाचे निर्देशानुसार बंदी घातलेल्या फटाक्याचे उत्पादन, विक्री किंवा वापर तसेच विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जर कोणी जवळ बाळगत असेल, 

त्याचा साठा करत असेल किंवा त्यांची विक्री करत असेल, अशी बाब जनतेच्या निदर्शनास आल्यास जनतेने स्वयंप्रेरणेने त्यांच्या क्षेत्रातील नजीकच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करावी. असे आवाहन अभिजीत राऊत, जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!