जळगाव प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीचे दीपनगर निंभोरा येथील प्रगतशिल शेतकरी प्रकाश यशवंत सरदार यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. ते अनुसूचित जाती जमाती गटातून शेतकरी विकास पॅनलतर्फे यू. जी. पाटील यांचे नेतृत्वात जळगाव जिल्हा बँक निवडणूक लढवित आहेत.
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि केंद्र शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याबाबत कटिबद्ध असल्याचा मनोदय प्रकाश सरदार यांनी सुवर्ण दिप न्युज शी बोलतांना सांगितले.