भारतीय संविधान घराघरात पोहचवा - प्रा.गजेंद्र गवई यांचे प्रतिपादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

मंडप गाव जि.बुलढाणा(प्रतिनिधी)

       आपल्या भारत देशात अस्तित्वात असलेली संविधानिक लोकशाही प्रत्येक भारतीय नागरिकाला समता, स्वातंत्र्य, बंधुभाव,सामाजिक न्याय प्रदान करते त्यामुळे संविधानिक मूल्यांची जपनुक व्हावी यासाठी प्रत्येक गावागावात संविधान जागर करून भारतीय संविधान घराघरात पोहचवा असे मत मंडपगाव ता दे राजा येथे दिनांक 19/11/2021 रोजी भारतीय सैन्यात अरुणाचल प्रदेश येथे सुभेदार म्हणून कार्यरत असलेले संतोष भीकाजी कदम यानी फुले शाहू आम्बेडकर विचार मंच व कदम फाउंडेशन च्या वतीने आयोजित कार्तिक पौर्णिमा च्या निमित्ताने आयोजित संविधान जागर -समाज प्रबोधन या कार्यक्रमात प्रा गजेंद्र गवई यांनी व्यक्त केले .[ads id="ads2"]  

  सदर कार्यक्रमाच्या आध्यक्षस्थानी माजी थानेदार अशोकजी काकड़े होते तर प्रमुख उपस्थिति सिद्धार्थ गवई, केशव गवई, सत्यपाल गवई, भगवान गवई, प्रकाश कदम गारखेड़, प्रदीप खरात यांची होती .कार्यक्रमाच्या सुरुवातीला विहारस्थित असलेल्या तथागत बुद्ध व डॉ आंबेडकर यांच्या पुतल्यास व प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पन करण्यात आले .सामूहिक बुद्धवन्दना घेण्यात आली.[ads id="ads1"]  

  प्रमुख मार्गदर्शक तथा प्रवचनकार प्रा गजेंद्र गवई यांनी संविधान जागर-समाज प्रबोधन अंतर्गत भारतीय संविधान, प्रस्ताविका, मुलये, यासह मूलभूत अधिकार, समाज संगठन, समाजाची दशा आणि दिशा याविषयी अनेक दाखले व संदर्भ देत तब्बल दोन तास परिसरातील अनेक गावातून आलेल्या उपस्थित समाज बाँधवाना प्रवचनातून मार्गदर्शन केले, बुद्ध, फुले शाहू आम्बेडकर, जिजाऊ,सावित्री, रमाई यांचा त्याग, जीवनसंघर्ष, समर्पण याबाबत माहिती दिली. 


 कार्यक्रमास बहुसंख्य गावकरी, महिला , तरुण उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी फौजी संतोष कदम, भगवान गवई, भीकाजी कदम, माज़ी थानेदार अशोकजी काकड़े, प्रकाश कदम, प्रदीप खरात, अशोक खरात, मुरलीधर खरात, वाल्मीक गवई, राजेन्द्र काकड़े, सर्जेराव खरात,शालिकराम खरात यांनी परिश्रम घेतले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोकजी काकड़े यांनी केले..

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!