कैद्याला भेटू देण्यासाठी २ हजाराची लाच घेणारा पोलीस नाईक ACB च्या जाळ्यात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

भुसावळ कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला भेटू देण्यासाठी २ हजाराची लाच घेणाऱ्या पोलीस नाईकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.[ads id="ads2"]  

अनिल लोटन देवरे असे अटक केलेल्या पोलीस नाईकाचे नाव आहे.

तक्रारदार चे नातेवाईक कारागृहात असून त्यांना भेटू देण्यासाठी संशयित पोलीस नाईक अनिल लोटन देवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. [ads id="ads1"]  

  तडजोड अंती २ हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर ठरले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचून सोमवारी दि. १५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून २ हजारांची लाच स्विकारतांना अनिल देवरे यांना रंगेहात अटक केली.

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील व पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या नेतृत्वात हा सापळा रचण्यात आला होता. दरम्यान या घटनेमुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!