जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती द्वारा आयोजितपेन्शन संघर्ष यात्रेला 'आयटा' महाराष्ट्र चा जाहिर पाठिंबा

अनामित
रावेर - जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी म्हणून 'पेन्शन संघर्ष समन्वय समिती' च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात पेन्शन संघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या पायदळ यात्रेला ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन 'आयटा' ने जाहिर पाठिंबा दिला आहे.
[ads id="ads2"]
राज्यातील ज्या कर्मचाऱ्यांना अंशदान निवृत्तीवेतन योजना (डीसीपीएस/एनपीएस) लागू आहे ती रद्द करूण सन १९८२ ची कुटुंब निवृत्तीवेतन योजना लागू करावी अशी रास्त मागणी ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन 'आयटा' (शिक्षक संघटना) सुद्धा करत आलेली आहे
[ads id="ads1"] म्हणूनच आयटा महाराष्ट्रचा या पेन्शन संघर्ष यात्रेला व नियोजित पायदळ पेन्शन दिंडीला जाहिर पाठिंबा आहे. असे समन्वय समितीचे निमंत्रक वितेश खांडेकर यांना दिलेल्या पत्रात ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन 'आयटा' महाराष्ट्र चे राज्य अध्यक्ष सय्यद शरीफ यांनी म्हटले आहे.
सदरील पेन्शन संघर्ष यात्रा २२ नोव्हेंबर २०२१ रोजी आझाद मैदान मुंबई येथून निघाली असून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून प्रवास करीत ८ डिसेंबर २०२१ ला नागपूर येथे पोहोचणार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!