भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : नगरपरिषदेची निवडणूक स्थानिक प्रश्नांवर आणि नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण लढत आहोत. त्यामुळे आपल्याला राजकारण बाजूला सारून निवडणुकीत जनतेचे प्रतिनिधित्व करायचे आहे या वेळी अनिल चौधरी यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या.[ads id="ads2"]
तब्बल चार पाच तास ही बैठक चालू होती . यामध्ये आगामी निवडणुका ,नगर पालिकेच्या निवडणुका ,जिल्हा परिषदा या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यात आला. यामध्ये सोशल मीडिया कामकाजाविषयी, नवीन धोरण, या विषयी चर्चा झाली.[ads id="ads1"]
याप्रसंगी प्रहारचे युवक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, उपजिल्हाध्यक्ष संजय आवटे, उपजिल्हाध्यक्ष विलास पांडे, शेतकरी आघाडी उपजिल्हाध्यक्ष गणेश बोरसे, जामनेर तालुकाध्यक्ष प्रदीप गायके, यावल शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तुकाराम बारी, अल्पसंख्याक रावेर यावल विधानसभा क्षेत्र प्रमुख आलीम शेख, भुसावळ शहराध्यक्ष प्रकाश कोळी, रावेर तालुकाध्यक्ष पिंटू धांडे, जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुख बबलू खान भुसावळ युवक शहराध्यक्ष, सनी गोणे, यावल युवक शहराध्यक्ष राहुल कचरे, मोहन माळी सर्व जळगाव जिल्ह्यातील शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, गाव प्रमुख प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

