जळगाव जिल्हा बँक निवडणूक रावेर येथे जनाबाई महाजन विजयी

अनामित
जळगाव - जिल्ह्यात नुकतीच पार पडलेल्या जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला, तर यांत जळगाव जिल्हा बँक निवडणूक रंणागणात रावेर येथुन राष्ट्रवादीचे माजी आमदार अरूण पांडुरंग पाटील यांनी आधीपासूनच तयारी केल्यामुळे ते निवडणुकीच्या रिंगणात राहतील असे स्पष्ट संकेत मिळाले होते. [ads id="ads2"]
तर त्यांच्या विरूध्द नंदू महाजन आणि अन्य उमेदवार अशी लढत होईल असे मानले जात होते. पंरतु नंदू महाजन यांनी भाजपच्या निर्णयानुसार माघार घेतली. मात्र ही जागा कॉंग्रेसला सोडल्याने अरूण पाटील यांनी थेट भाजपचा पाठींबा मिळविला. भाजपने त्यांना पुरस्कृत केल्याने राजकीय रणांगणात खळबळ उडाली. [ads id="ads1"]
त्यांच्या विरोधात कॉंग्रेसने जनाबाई गोंडू महाजन यांना उमेदवारी जाहीर केली . यानंतर माजी उपाध्यक्ष राजीव पाटील हे देखील रिंगणात उतरल्याने तिरंगी सामना होण्याची शक्यता होती,परंतु या दोन्ही उमेदवारांनी अरूण पांडुरंग पाटील यांना पाठींबा दिल्यामुळे त्यांचा विजय एकतर्फी होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र पडद्याआड खूप काही वेगळेच चित्रपट सुरु होते, आज झालेल्या मतमोजणीत सर्वकाही समोर आले एकूण ५४ पैकी जनाबाई महाजन यांना २६ तर अरुण पांडुरंग पाटील यांना २५ आणि राजीव पाटील यांना 0 मते प्राप्त झाली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!