दुचाकीची कारला धडक; पाडळसा गावाजवळची घटना : पोलीसात गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 जळगाव प्रतिनिधी (समाधान गाढे)  पाडळसा ते भुसावळ रोड दरम्यान कारची दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून कारचे मोठे नुकसान झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads2"]  

याबाबत माहिती अशी की, तुळशीराम धोंडू पाटील (वय-६५) रा. एसएमआयटी नगर जळगाव हे आपल्या कार क्रमांक (एमएच १९ बीयू ४८७८) ने २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास भुसावळकडून फैजपूर मार्गे रावेर येथे जात असतांना पाडळसा ते भुसावळ दरम्यान समोरू येणारी दुचाकी क्रमांक (एमपी ६८ एमजी ९८०५) ने जोरदार धडक दिली. [ads id="ads1"]  

  यात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला तर दुचाकीसह कारचे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा :- राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे अवैध बिअरसह मुद्देमाल जप्त

 याप्रकरणी तुळशीराम पाटील यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात (एमपी ६८ एमजी ९८०५) क्रमांकाच्या अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेश वंजारी करीत आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!