[ads id="ads2"]
संबलपूर (ओडिशा) - ओडिशातील संबलपूर जिल्ह्यात मंगळवारी दोन भावांचा विहिरीत पडून मृत्यू झाला.
सुशील त्रिपाठी (40) आणि सुनील त्रिपाठी (38) हे टाऊन पोलीस स्टेशन अंतर्गत साहू कॉलनी परिसरात त्यांच्या घरासमोरील 30 फूट खोल विहिरीच्या गोलाकार भिंतीवर बसले होते, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
[ads id="ads1"]
टाऊन पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक प्रकाश कर्ण म्हणाले, “त्यापैकी एकजण अचानक विहिरीत पडला पण त्याचवेळी स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्याचा हात खेचला. यामुळे दोघेही विहिरीत पडले.
स्थानिक लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना वाचवता आले नाही, असे या अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने त्यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कर्णने सांगितले की, दोघांनाही रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.